मयत शेतक:याच्या वारसांना मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:08 IST2019-11-25T11:08:53+5:302019-11-25T11:08:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसात पिक सडत नुकसान झाले. हातात काही आले नसल्याने वेलखेडी ...

मयत शेतक:याच्या वारसांना मदत देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसात पिक सडत नुकसान झाले. हातात काही आले नसल्याने वेलखेडी ता.धडगाव येथील एका शेतक:याने आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना शासनामार्फत मदत देण्याची माणी करण्यात आली आहे.
ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाले. उर्वरित पिक सततच्या पावसामुळे नष्ट झाले. हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला. त्यामुळे मोना तडवी रा.वेलखेडी ता.धडगाव याने शेतातील महुच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली.घरातील कर्ता व्यक्तीच न राहिल्याने कुटुंबावर संकटाचे डोंगर कोसळले. उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. यांना तात्काळ मदतीची गरज होती, पण अजुनही कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. मोना तडवी यांच्या कुटुंंबियांना शासनामार्फत मदत देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. मदत न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर वेलखेडी ग्राम पंचायतचे सरपंच दिलीप पाडवी, ईश्वर तडवी, बबन तडवी, दारासिंगं पाडवी, मंगेश वळवी, चिंतामण तडवी, संजय वळवी, अॅड. सिना पराडके, अॅड. सायसिंग वळवी, प्रा. राकेश वळवी, सेगा वळवी, खेमसिंग पटले यांच्या सह्या आहेत.