शहरात शांतता कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:54 IST2020-07-29T12:54:08+5:302020-07-29T12:54:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी सण उत्सवांसह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी ...

शहरात शांतता कमिटीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आगामी सण उत्सवांसह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत होते़
बैठकीत प्रांताधिकारी वसुमना पंत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, बाळासाहेब भापकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते़ बैठकीत पोलीस अधिक्षक पंडीत यांनी आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले़ प्रांताधिकारी वसुमना पंत यांनी लॉकडाऊनमधून येत्या काळात शिथिलता मिळाल्यानंतर नागरिकांना योग्य प्रकारे नियोजन करुन सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासह इतर उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना केल्या़ बैठकीत नगरसेवक कुणाल वसावे गजेंद्र शिंपी, निंबा माळी, हाफिज अब्दुल्ला, फारूख पठाण, मोहन खानवाणी, कमल ठाकूर, नगरसेवक चारूदत्त कळवणकर, आनंदा माळी यांनी विविध विषयांवर चर्चा केली़