आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून पवार यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:22 IST2020-03-13T12:22:15+5:302020-03-13T12:22:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आर.डी.पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ...

आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून पवार यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आर.डी.पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार देवून मुंबई येथे गौरविण्यात आले.
कोठली खुर्द, ता.नंदुरबार येथील ग्राम विकास अधिकारी रोहिदास दगा पवार यांचा यशवंतराव पंचायत राज अभियान २०१९-१९ मधील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती.
मुंबई येथे १२ रोजी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांच्या हस्ते पुरस्कार देवून सपत्नीक गौरव करण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी भूपेंद्र राजपूत, भूपेंद्र माळी, बी.जी.पाटील, सूर्यकांत दसपुते, टि.के.खरे, बी.ए.पाटील, योगेंद्र बागल, आदिवासी एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष जगदीशभाऊ सोनवणे, सुनील माळी उपस्थित होते.