पितृपक्षाने मार्केटला लावला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:41 IST2019-09-25T12:40:56+5:302019-09-25T12:41:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पितृपक्षामुळे बाजार मंदावला असून बाजारात चैतन्याचा अभाव दिसून येत आहे. या पक्षात कोणतेही मोठे ...

पितृपक्षाने मार्केटला लावला ‘ब्रेक’
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पितृपक्षामुळे बाजार मंदावला असून बाजारात चैतन्याचा अभाव दिसून येत आहे. या पक्षात कोणतेही मोठे व्यवहार होत नसल्यामुळे अनंत चतुर्दशीपासून सर्वच खरेदीही मंदावली आहे. हा कालावधी धार्मिकदृटय़ा अनेक बाबींना अशुभ मानला जात असून बाजाराकडे ग्राहकांची पाठ फिरवणाराही आहे. अनंत चतुर्दशी पूर्वीच्या उलाढालीच्या तुलनेत सद्यस्थितीत बाजारात 12 ते 15 टक्केच उलाढाल होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील चैतन्यासारख्या उलाढालीसाठी नवरात्रोत्सवाकडे व्यापा:यांचे लक्ष लागून आहे.
पितृपक्षात दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहून त्यांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावाने श्राध्द घातले जाते. याच कालावधीत काही वर्ग नवीन खरेदी करणे वज्र्य मानतो, त्यात वडिलधारी मंडळींचा अधिक समावेश असतो. या कालावधीत कुठलेही शुभ कार्य होत नाही. शिवाय नवीन वस्तूंची खरेदीही केली जात नाही. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. तरुण मंडळी पितृपक्ष मानत नसले तरी घरातील ज्येष्ठांनी मात्र या 15 दिवसात नवीन खरेदी वज्र्य केली आहे. पितृपक्षाचा सर्वाधिक परिणाम सराफ बाजारावर झाला असून सोने-चांदीच्या मागणीत 80 टक्के घट झाली आहे. सद्यस्थितीत येणारे ग्राहक हे नवरात्रोत्सवासाठी लागणा:या दागिन्यांची ऑर्डर द्यायला येत आहे.
गणेशोत्सवातील आनंदासोबतच खरेदीचा आनंद पितृपक्षामुळे ओसरला आहे. ही बाब शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे शोरूम्स, सोने-चांदीची दुकाने व अन्य दुकानांमध्येही दिसून येत आहे. काही वर्षापासून सोने व जमिनीती गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यात चांगला परतावा मिळत असल्याची जाणिव अनेकांना झाली आहे. यात गुंतवणूक करणारा प्रत्येक जण मंदिच्या प्रतिक्षेत असतो. तरीही पितृपक्षात या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. एलईडी, युएलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन्स यासह विविध विक्रेत्यांना या मंदीचा फटका बसला आहे. या क्षेत्रातील खरेदीत तब्बल 80 ते 85 टक्क्याने घटल्याचे व्यावसायिकंमार्फत सांगितले जात आहे. अर्थात अशा वातावरणामुळे स्वत: ग्राहकांसह व्यावसायिकांचेही डोळे नवरात्रोत्सवाकडे लागले आहेत. नेहमीच ग्राहकांच्या वर्दळीचे ठिकाण काही दिवसांपासून ओस पडली आहे. गणेशोत्सवातील विविध कंपन्यांनी जाहीर केलेल्या ऑफर्स पितृपक्षातही लागू आहे. तरीही खरेदीसाठी मुहूर्त पाहण्याची मानसिकता ग्राहकांमध्ये बदलली नसल्याचे व्यापा:यांमार्फत सांगितले जात आहे.
पितृपक्षात व्यापा:यांकडून शक्यतो नवीन माल खरेदी केला जात नाही. यंदाही अनेकांनी जुना स्टॉक क्लिअर करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे बाजारात नवीन व्हरायटी दिसून आल्या नाहीत. साधारण नवरात्रीच्या तीन ते चार दिवस आधी नवीन माल मागवला जाण्याची शक्यता आहे. यात नवरात्री व दस:याची खरेदी लक्षकेंद्रीत करुन माल भरला जाणार असल्याचे व्यापा:यांमार्फत सांगण्यात आले. यंदाच्या पितृपक्षात शिवून वापरल्या जाणा:या कापड व्यवसायावर मोठा परिणाम दिसून आला. ग्राहकांनी शिवून वापरण्यापेक्षा रेडीमेड कपडय़ांना अधिक पसंती दिल्याने रेडिमेडच्या तुलनेत कापड व्यवसायाला 50 टक्क्याहून अधिक फटका बसल्याचे व्यापा:यांनी सांगितले.
बिल्डरांनी घरांच्या
बांधकामावरच दिला भर
पितृपक्षामुळे जमिन व घर खरेदीला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे बिल्डरांनीही याकडे काही अंशी दुर्लक्षच केले आहे. घरभरणी, खरखरेदीसाठी बहुतांश कुटुंबांना दसरा व दिवाळीची प्रतिक्षा असते त्यामुळे प्लॉट-फ्लॅटच्या कामांच्या तुलनेत बिल्डर घरांची कामे पूर्ण करण्यासाठी भर देत आहे. काही कुटुंबांना बिल्डरांकडून दसरा व दिवाळीचाच वायदा दिला असून बांधकामांना ते प्राधान्य देत आहे.