बोरद आरोग्य केंद्रात कर्मचारी कमतरतामुळे रूग्णाचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST2021-03-04T04:59:20+5:302021-03-04T04:59:20+5:30
कर्मचाऱ्यांना बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्रात जावे लागते. तरी जवळ पास ४२ हजार लोकसंख्या या आरोग्य ...

बोरद आरोग्य केंद्रात कर्मचारी कमतरतामुळे रूग्णाचे हाल
कर्मचाऱ्यांना बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्रात जावे लागते. तरी जवळ पास ४२ हजार लोकसंख्या या आरोग्य केंद्राला जोडले आहे. मात्र कामाचा मोठा भार फक्त येथील १६ कर्मचाऱ्यांना उचलावा लागत आहे.वास्तविक या प्राथमिक आरोग्य केंद्रात दरदिवशी शंभरपेक्षा अधिक रुग्ण उपाचार घेत असतात. त्याच बरोबर आरोग्य केंद्रात नियमित संतती शस्त्रक्रिया करण्यात येतात. परिसरातील तीस ते चाळीस महिलांची प्रसूती केल्या जात असून दरमहा लसीकरण करण्यात येत असते. गेल्या वर्षापासून कोरोना महामारीची भयावह परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीची इतरत्र बदली करण्यात आली असल्याने जुन्या जागी नवीन कर्मचारी देण्यात आले नसल्याने उलट कोरोना महामारीत काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज असताना कर्मचाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्यात येत आहेत.
राज्य शासनाने मानधन तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्याची घोषणा केली असून तळोदा तालुक्यात कंत्राटी कर्मचारी नियुक्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. बोरद केंद्रात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सतत वरिष्ठाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र या अहवालाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याने निदान मानधन तत्वावर तरी प्रशासनाने नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा,अशी मागणी होत आहे.
लाखापूर उपकेंद्रात डॅाक्टरच नाही
बोरद प्राथमिक केंद्र अंतर्गत लाखापूर येथे आरोग्य उपकेंद्र सुरू असून सदर उपकेंद्रात परिसरातील दुर्गम गाव,पाड्यातील नागरिक उपचाराकरिता येतात. परंतू येथील वैद्यकीय अधिकारीची जागा रिक्त असल्याने इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर काम भागवावे लागत आहे. वास्तविक दुर्गम भागातील हे उपकेंद्र असल्यामुळे येथे कायमस्वरुपी नियमित डॉक्टरची आवश्यकता आहे. तरीही नियमित अधिकारी दिला जात नसल्याची व्यथा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण रूग्णालयांची मागणी
या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय व्हावे यासाठी परिसरांतील नांगरिकांनी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र त्याकडे अजूनही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयांचा प्रश्न कायम आहे. त्या बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली असून कमी जागेमुळे आरोग्य केंद्रातील शिबिरे बाहेर घ्यावी लागत आहे.