मागील भांडणाची कुरापत काढून दोघा महिलांना मारहाण व विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 11:58 IST2019-04-18T11:57:55+5:302019-04-18T11:58:55+5:30
तीनसमाळची घटना : सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

मागील भांडणाची कुरापत काढून दोघा महिलांना मारहाण व विनयभंग
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तीनसमाळ येथे मागील भांडणाची कुरापत काढून दोघा महिलांना मारहाण करुन त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली़ 11 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घडलेल्या घटनेप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़
तिनसमाळ येथील 33 वर्षीय महिला 11 एप्रिल रोजी गावालगतच्या नाल्यातून गावातीलच महिलेसह जात असताना सायसिंग खाज्या पावरा, प्रदीप रेहज्या पावरा, वसंत खाज्या पावरा, रेहज्या खाज्या पावरा, दाकलसिंग कन्या पावरा, सचिन रुप्या पावरा सर्व रा़ तीनसमाळ यांनी दोघींना थांबवून मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला़ दोघा महिलांनी विरोध केला असता, सायसिंग पावरा याने 33 वर्षीय महिलेस मारहाण करण्यास सुरुवात केली़ इतरांनीही महिलेस लज्जा येईल असे कृत्य करत मारहाण केली़ यावेळी महिलेला सोडवण्यासाठी आलेल्या गावातील दुस:या महिलेलाही सर्व सहा जणांनी बेदम मारहाण केली़ यावेळी संशयितांनी महिलेचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला़ घटनेनंतर दहशतीत असलेल्या महिला व त्यांच्या कुटूंबियांनी विचारविनिमय करुन मंगळवारी रात्री उशिरा पायीच तीनसमाळ येथून धडगाव येथे येत पोलीसात फिर्याद दिली़ 33 वर्षीय पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन सायसिंग, प्रदीप, वसंत, रेहज्या, दाकलसिंग आणि सचिन पावरा यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला़ आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काझी करत आहेत़ पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी महिलांची भेट घेत माहिती जाणून घेतली़