बस अपघातात विद्याथ्र्यासह प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:02 IST2019-07-27T13:02:21+5:302019-07-27T13:02:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : समोरुन येणा:या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस साईडपट्टी खाली उतरल्याने अपघात झाल्याची घटना प्रतापपूरपासून एक ...

बस अपघातात विद्याथ्र्यासह प्रवासी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : समोरुन येणा:या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस साईडपट्टी खाली उतरल्याने अपघात झाल्याची घटना प्रतापपूरपासून एक किलोमीटर अंतरावर शुक्रवारी घडली. या अपघातात 20 ते 25 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून त्यामुळेच अपघात झाल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.
तळोदा बसस्थानकातून तीन वाजता सुटणारी तळोदा-खर्डी ही बस (क्रमांक एम.एच.20 डी- 9500) प्रतापपूरपासून एक किलोमीटर अंतरावर राणीपूर रस्त्याने खर्डीकडे जात होती. त्याचवेळी समोरुन येणा:या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचे चालक एन.पी. कोळी यांनी बस साईडपट्टीच्या खाली उतरवली. मात्र चिखल असल्याने बस खड्डय़ात जाऊन आदळली. या अपघातात खर्डी येथील सूरसिंग गेंद्या पाडवी, रामा नाना पाडवी, जयतूबाई रामा पाडवी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघातानंतर प्रतापपूर ग्रामस्थांनी ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने बस खड्डय़ातून काढण्यास मदत केली. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल चालक एन.पी. कोळी व वाहक बी.डी. ठाकरे यांनी आभार मानले. तळोदा तालुक्यातील प्रतापपूर ते खर्डी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या साईडपट्टय़ा नामशेष झाल्या असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात या रस्त्याव वारंवार अपघात होत असून काही जण जायबंदी झाले आहेत. या रस्त्यावर दोन मोठी वाहने आली तर ती काढण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते. शुक्रवारी झालेला बसचा अपघातही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया राणीपूर, खर्डी, बंधारा, धनपूर, सावरपाडा, प्रतापपूर येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. या रस्त्याचे काम तातडीने सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही वरील गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.