टपावरुन प्रवासी वाहतुक बंदीसाठी काढल्या कॅरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:07 PM2019-11-19T12:07:47+5:302019-11-19T12:07:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आधीच अवघड व अपघातग्रस्त ठरणा:या तळोदा ते धडगाव मार्गाने खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडून ...

Passenger carriers removed from the stage to ban traffic | टपावरुन प्रवासी वाहतुक बंदीसाठी काढल्या कॅरी

टपावरुन प्रवासी वाहतुक बंदीसाठी काढल्या कॅरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : आधीच अवघड व अपघातग्रस्त ठरणा:या तळोदा ते धडगाव मार्गाने खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडून जिपगाडय़ांच्या टपावरुन प्रवाशांची धोकेदायक वाहतुक करण्यात येते. अशा वाहतुकीवर तळोदा पोलीसांमार्फत बंदी करण्यात आली आहे. पुन्हा अशी वाहतुक              होऊ नये म्हणून या मार्गावर प्रवासी वाहतुक करणा:या प्रत्येक जिपगाडय़ांच्या कॅरीही काढण्यात आल्या आहे.
तळोदा ते धडगाव हा मार्ग वळणदार असून तो जिल्ह्यातील सर्वाधिक धोक्याचा मार्ग  असल्याचे सांगण्यात येते. तिव्र चढ-उतार, अरुंद त्याशिवाय अगदी गोलाकार स्वरुपाचे वळणे या  मार्गावर आहेत. त्यामुळे हा   रस्ता बहुतांश वाहतुकीला अवघड ठरत असून धोक्याचा  देखील आहे. त्यामुळे या मार्गावर  मोठी वाहतुक सुरूच करण्यात आली नाही. रस्त्याच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे मोठय़ा बसेस  देखील जाऊ शकत नसल्यामुळे नंदुरबार आगारामार्फत मिनी बससेवा सरू करण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीत हा मार्ग अधिकच खराब झाल्याने ही बससेवा देखील बंद करण्यात आली     आहे. 
ही वाहतुक करतांना प्रवाशांना वाहनाच्या टपावरील कॅरीचा आधार दिला जातो. कॅरीच्या आधारे वाहनात जेवढे प्रवासी बसतात, त्याहीपेक्षा अधिक        प्रवासी टपावर बसविले जात  होते. त्याशिवाय जिपगाडय़ांच्या  तिन्ही बाजूला देखील प्रवासी  उभे करीत वाहतुक करण्यात येत होती. साध्या प्रवासालाच  धोक्याचा ठरत असतानाच या  मार्गाने बहुतांश जिपगाडय़ांच्या टपावरुन प्रवाशांची वाहतुक  करण्यात येत होती. ही वाहतुक प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत  असल्याने कधीही मोठय़ा अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली. संभाव्य धोके तथा अपघात टाळत प्रवाशांना  सुरक्षीत प्रवास करता यावा,  यासाठी तळोदा पोलीसांमार्फत या जीवघेण्यात प्रवासी वाहतुकीवर  काही अंशी नियंत्रण आणले आहे. 
काही वर्षापासून टपावरुन प्रवासी वाहतुक करणा:या प्रत्येक वाहनांच्या कॅरी काढण्याचे  निर्देश तळोदा पोलीसांमार्फत  देण्यात ओ होते. पोलीसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत सर्वच वाहनधारकांनी देखील आपापल्या वाहनावरील कॅरी   काढून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेली जीवघेणी वाहतुक सुखरुप झाल्याचे म्हटले जात आहे. जनहितासाठी पोलीस प्रशासनामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाचे केवळ प्रवाशांमधूनच नव्हे तर खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडूनही कौतुक   करण्यात येत आहे. 

कॅरीचा आधार देत प्रवाशांना टपावर बसवून त्यांची वाहतुक करणे वाहनधारकांच्या आर्थिक उन्नतीचे होतेच, परंतु प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही बाब अत्यंत धोक्याची होती. वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत असले तरी जीवीत हानी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला हा निर्णय जनहिताचा ठरतो. टपावरुन होणारी वाहतुक थांबविण्यासाठी कॅरी काढण्यात आल्याने प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. तळोदा ते धडगाव या मार्गावरुन प्रवास करणा:या प्रत्येक प्रवाशांकडे मोठा सामान असतो. हा सामान वाहनात ठेवल्यास प्रवाशांना बसण्यास अडचण येते. त्यामुळे सामान वाहनाच्या टपावर ठेवणेच अधिक योग्य ठरते. परंतु प्रत्येक वाहनाच्या कॅरीच काढल्यामुळे प्रवाशांना सामान ठेवण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

Web Title: Passenger carriers removed from the stage to ban traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.