अंनिसतर्फे जोडीदाराची विवेकी निवड कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:36 IST2019-09-09T12:36:01+5:302019-09-09T12:36:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागामार्फत एक दिवसीय संवादशाळा घेण्यात ...

Partner's Discretionary Selection Workshop by Annis | अंनिसतर्फे जोडीदाराची विवेकी निवड कार्यशाळा

अंनिसतर्फे जोडीदाराची विवेकी निवड कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागामार्फत एक दिवसीय संवादशाळा घेण्यात आली.
लग्नाळू मुले-मुली व पालकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. लग्नाआधी संबंध जोडताना समाजात पारंपरिक पद्धतीने आर्थिक परिस्थिती, नोकरी, शिक्षण या गोष्टींना प्राधान्यक्रम देऊन संबंध जोडले जातात. पण  दोन कुटुंबातील विचार, संस्कार, विवेक या गोष्टींना फारसे महत्व दिले जात नाही व पुढे विवाहानंतर ब:याचदा घटस्फोट, विसंवाद अशा घटना वाढत आहे. समाजात घडणारे हे प्रकार कमी व्हावे यासाठी अंनिसने युवक-युवती व पालक यांना जोडीदाराची विवेकी निवड असा विभाग सुरू केला आहे. येथे झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शक आरती नाईक व सचिन थिटे यांनी लग्न जमवण्याआधी युवक युवतीत कोणते विवेक तपासायला हवे, कोणत्या गोष्टीला जास्त महत्व दिले पाहिजे. हुंडा, मानपानाच्या भव्यतेपेक्षा दोन कुटुंबातील विचारांची अनुकूलता कशी महत्वाची आहे. हँडसम-ब्युटीफुल दिसण्यापेक्षा स्वभाव गुण सुंदर असणे का महत्वाचे अशा विविध विषयांवर  संवाद, पीपीटी, गटचर्चा करून कार्यशाळा झाली. कार्यशाळेसाठी शंभरहून अधिक युवक-युवती आणि पालक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींनी  लग्न जमवण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबी तपासायला हव्यात हे आज ख:या अर्थाने समजले आहे, असे मत व्यक्त केले. सर्व सहभागीना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यशाळेला अंनिसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.अजरुन लालचंदानी, उपाध्यक्ष डॉ.सी.डी. महाजन, शाखाध्यक्ष डॉ.प्रसाद सोनार, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, शांतीलाल शिंदे, खंडू घोडे, फिरोज खान, किर्तीवर्धन तायडे, सूर्यकांत आगळे, वसंत वळवी, चंद्रमणी                बरडे, उपक्रम कार्यवाह दिलीप  बैसाणे, व्यंकटेश शर्मा, धनश्री शिंदे, विश्विजत शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.    

Web Title: Partner's Discretionary Selection Workshop by Annis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.