म्हसावद परिसरातून ५३ धावपटूंचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:53 IST2020-09-07T11:53:09+5:302020-09-07T11:53:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित आॅनलाईन लोकमत व्हर्च्युअल महामॅरेथॉन रेड रनचे आयोजन रविवारी करण्यात आले. ...

म्हसावद परिसरातून ५३ धावपटूंचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित आॅनलाईन लोकमत व्हर्च्युअल महामॅरेथॉन रेड रनचे आयोजन रविवारी करण्यात आले. यात म्हसावद, ता.शहादा येथील ३८ स्पर्धकांनी सहभाग घेवून स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे जनतेचे आरोग्य जपण्यासाठी आॅनलाईन रेड रनचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी लाल रंग उत्साहाचा, उर्जेचा, धैर्याचा आणि लोकमतचा लाल रंग म्हणून धावपटूंनी पळताना लाल रंगाचा टी शर्ट वापरणे अनिवार्य करण्यात आले होते. म्हसावदच्या पाच वर्षाच्या दिया पाटील हिने तीन किलोमीटर स्पर्धा २५ मिनीटात पूर्ण केली हे विशेष. या स्पर्धेत सुनील पवार दहा किलोमीटरमध्ये प्रथम, दिपराज धनगर द्वितीय तर राकेश पवार तृतीय आला. सागर पाटील चौथा आला. ११ वर्षाचा विनीत पाटील याने दहा किलोमीटरमध्ये सहभाग घेवून एक तास चार मिनीटात पूर्ण केली तर ज्येष्ठ गटात सुधाकर पाटील यांनी एक तास चार मिनीटात पूर्ण केली. दहा किलोमीटर स्पर्धेत सहभागी स्पर्धक सुनील मोहन पवार (४० मिनीटे), दिपराज कृष्णा धनगर (४२ मिनीटे), राकेश पवार (४३ मिनीटे), सागर गणेश पाटील (४५), दुर्गेश भरत पाटील (५९ मिनीटे), आदित्य महेंद्र बैसाणे (१ तास), गौरव किशोर बागूल (१ तास १ मिनीट), हेमराज बाबू चौधरी (१ तास ३ मिनीटे), विजय छोटू आडगाळे (१ तास १२ मिनीटे), सुधाकर सजन पाटील (१ तास ४ मिनीटे), नितीन लक्ष्मीकांत महिंद्रे (१ तास ४ मिनीटे), राहुल पाडवी (१ तास ४ मिनीटे), विनीत शशिकांत पाटील (१ तास ४ मिनीटे), तारकेश्वर बापू महाले (१ तास ५ मिनीटे), सनी विनोद गवळे (५० मिनीटे), किरण हरी सोनवणे (१ तास १२ मिनीटे), महेंद्र कांतीलाल बैसाणे (१ तास २० मिनीटे), दुर्गेश काशिनाथ ठाकरे (१ तास १६ मिनीटे) यांनी यशस्वी सहभाग नोंदवला.
पाच किलोमीटर स्पर्धेत सहभागी स्पर्धक भूषण एकनाथ पाटील (३५ मिनीटे), जयंत सुधाकर पाटील (५२ मिनीटे), हर्षल हिंमतराव मोरे (४७ मिनीटे), गोवर्धन जगतसिंग राजपूत (४० मिनीटे), अविनाश सखाराम शिरसाठ (३५ मिनीटे), रोहित बन्सीलाल मुसळदे (३५ मिनीटे), चिराग ईश्वर चौधरी (५६ मिनीटे), उज्ज्वल किशोर चौधरी (५७ मिनीटे), दीपक ज्ञानेश्वर पाटील (५२ मिनीटे), उमेश पाटील (५० मिनीटे), भावेश संजय बोरसे (५० मिनीटे), तेजस विजय चौधरी (५८ मिनीटे), भावेश प्रवीण पाटील (५४ मिनीटे), पंकज छोटूलाल लामगे (५१ मिनीटे), अभिषेक महेंद्र बैसाणे (३६ मिनीटे), मलय दिनेश पाटील (५८ मिनीटे), मनोज यादव कुंभार (५८ मिनीटे). तीन किलोमीटर सहभागी स्पर्धक- प्रसाद वसंत लामगे (१५ मिनीटे), अनिकेत विजय लामगे (१५ मिनीटे), विकास भरत चौधरी (१८ मिनीटे), दिया शशिकांत पाटील (२० मिनीटे). स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लोकमतचे वार्ताहर सुधाकर पाटील यांनी परिश्रम घेतले तर शशिकांत पाटील, नितीन महिंद्रे, महेंद्र बैसाणे यांनी सहकार्य केले.
पाडळदा येथे १५ स्पर्धक
लोकमत वृतपत्र समुहातर्फे आयोजित आॅनलाईन लोकमत व्हर्च्युअल रेड रनमध्ये पाडळदा, ता.शहादा येथील १५ स्पर्धकांनी यशस्वी सहभाग नोंदवला. यात पाडळदा येथील प्रा.योगेश चौधरी यांनी तरूणांना सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. तीन किलोमीटर धावणे या स्पर्धेत योगेश मोहन चौधरी (१७ मिनीटे), सागर सुरेश गिरासे (२३ मिनीटे), प्रदीप ज्ञानेश्वर पवार (१९ मिनीटे), सागर अंबालाल पाटील (१७ मिनीटे), युवराज सुरेश पाटील (१५ मिनीटे), मुकुंद संभू पाटील (१५ मिनीटे), गोपाळ अशोक कोळी (२२ मिनीटे), जोगा मगन मंदील (२२ मिनीटे), गौरव सुरेश कुवर (१३ मिनीटे), कल्पेश ज्ञानेश्वर पवार (१६ मिनीटे), आदेश गणेश ईशी (१८ मिनीटे), संदीप भीमसिंग ठाकरे (२५ मिनीटे), दिनेश काशीनाथ जाधव (२३ मिनीटे), दीपक भरत पवार (२२ मिनीटे), शैलेश सुरेश पाठक (१६ मिनीटे) यांनी सहभाग घेवून स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.