शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

जिल्हाभरातील ७७ उपकरणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:50 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : विज्ञान, तंत्रज्ञानाला गवसणी घालत जिल्हाभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक उपकरण तयार करून ते जिल्हा विज्ञान ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : विज्ञान, तंत्रज्ञानाला गवसणी घालत जिल्हाभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक उपकरण तयार करून ते जिल्हा विज्ञान प्रदर्शनात मांडले आहे. ७७ उपकरणे सहभागी असून जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले.प्रकाशा ता. शहादा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जि.प.अध्यक्षा सिमा वळवी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सभापती अभिजीत पाटील, जयश्री दीपक पाटील, शिक्षणाधिकारी मच्छिन्द्रनाथ कदम, भानुदास रोकडे, गटशिक्षणाधिकारी ए.डी. पाटील, उषा पेंढारकर, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, विषयतज्ञ चंद्रकांत पाटील, प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पटेल, संचालक हरी दत्तू पाटील आदी उपस्थित होते.विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर समाजाचा आणि राष्ट्राचा प्रगतीसाठी करा असे विद्यार्थ्यांना आवाहन करीत सिमा वळवी यांनी जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी दरवर्षी शेस फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले.अभिजीत पाटील यांनी तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शन साठी निधीची मागणी आमच्याकडे मुख्याध्यापक संघटनेने केली होती. त्यानुसार आता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रदर्शनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शाळेच्या व समाजाच्या विकास करा असे त्यांनी सांगितले.मुकेश पाटील यांनी विज्ञान आणि मानव यांचा जवळचा संबंध आहे. जिल्ह्यातील इतर शाळांनी ही विज्ञान प्रदर्शन भरविण्यासाठी मागणी करावी असे त्यांनी आवाहन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी विविध उदाहरणे देत विज्ञानवादी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अमेरिका व युरोप हे देश प्रगती करीत आहे कारण त्यांचा कल जास्तीत जास्त विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याकडे आहे. तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाज आणि राष्ट्राच्या हितासाठी विद्यार्थ्यांनी करावा आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे असे त्यांनी आपल्या मनोगतातून केले. शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी प्रास्ताविकात जिल्ह्याने बारावेळा राष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन पारितोषिक मिळवले आहे. तसेच नऊवेळा इंस्पायर अवार्डमध्ये देखील राष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. तेव्हा गुणवत्ता सोबतच नंदुरबार जिल्हा विज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती करत असून अशा या विज्ञान प्रदर्शनातून एक चांगले शास्त्रज्ञ तयार होतील असे त्यांनी सांगितले.सुरुवातीला रिमोटद्वारे दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर इंस्पायर अवार्ड प्राप्त नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षक यांच्या सन्मान करण्यात असला त्यात श्रॉफ हायस्कूलची विद्यार्थिनी आर्या पाटील, शिक्षिक चेतना पाटील, एकलव्य विद्यालयाची अक्षरा आगीवाल, शिक्षक मिलिंद वडनेरे, भाग्यचिंतन विद्यालयाची मोगरा पाडवी, शिक्षक भिका भोई या विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे तर आभार शाळेचे प्राचार्य आय.डी .पटेल यांनी मानले.