अक्कलकुवा नगरपंचायत होण्यासाठी लागणार संसदेची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST2021-08-19T04:33:44+5:302021-08-19T04:33:44+5:30
प्रस्तावांतर्गत अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये माहिती पेसांतर्गत तरतुदींची माहिती देऊन ठराव करणे तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव करण्याचे आदेश ...

अक्कलकुवा नगरपंचायत होण्यासाठी लागणार संसदेची परवानगी
प्रस्तावांतर्गत अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये माहिती पेसांतर्गत तरतुदींची माहिती देऊन ठराव करणे तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान जिल्हाधिकारी यांना राज्य शासनामार्फत केंद्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत सूचित केले होते. त्यानुसार अक्कलकुवा गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन अक्कलकुवा ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेत ठराव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर राैंदळ यांना संपर्क केला असता, त्यांनी बीडीओंना ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले असून त्याचा ठराव आल्यानंतर तातडीने तो राज्य शासनाकडे दिला जाणार असल्याचे म्हटले आहे.
मग धडगाव ही अनुसुचित क्षेत्रात होते त्याचे काय..
दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील धडगाव ही आणखी एक नगरपंचायत जिल्ह्यात आहे. याठिकाणी पेसांतर्गत सर्व तरतुदी लागू असताना तत्कालीन शासनकर्त्यांनी तडकाफडकी धडगाव नगरपंचायत निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अक्कलकुवा नगरंपचायतीसाठीच संसदेची परवानगी गरजेचेही आहे का, किंवा कसे असा प्रश्न जिल्ह्यातून उपस्थित करण्यात येत आहे.
अशी आहे संरचना
अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ हे २२८.०० चाैरस किमी एवढे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार याठिकाणी २९ हजार ८८७ एवढी आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या या शहरात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गुजरात हद्दीलगत असल्याने व्यावासायिकदृष्ट्या अक्कलकुवा हे महत्त्वाचे शहर आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या कारवाईला खो मिळत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
अक्कलकुवा हे तालुक्याचे ठिकाण आहे. २०१७ मध्ये शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्यात यावे, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने काढले पाहिजेत. ही शहरातील नागरिकांची मागणी आहे.
-इंद्रपालसिंह राणा, उपसभापती, पंचायत समिती, अक्कलकुवा.