ससप्रमुळे नंदुरबार जिल्ह्यातून परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:23 IST2020-02-01T13:22:38+5:302020-02-01T13:23:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमध्ये बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्प बांधण्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदेची परिक्रमा होत नव्हती. हे प्रकल्प ...

Parikrama from Nandurbar district due to rape | ससप्रमुळे नंदुरबार जिल्ह्यातून परिक्रमा

ससप्रमुळे नंदुरबार जिल्ह्यातून परिक्रमा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरातमध्ये बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्प बांधण्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदेची परिक्रमा होत नव्हती. हे प्रकल्प बांधल्याने पाण्याचा फुगवटा वाढत परिक्रमा मार्गाचे क्षेत्रफळही वाढले. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून परिक्रमेला सुरुवात झाली. या मार्गावर उभारलेल्या आश्रमांमध्ये नर्मना जयंतीनिमित्त अनेक उपक्रम होणार आहे.
धार्मिकदृष्ट्या नर्मदा परिक्रमेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सर्वात मोठी परिक्रमा म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. ही परिक्रमा तीन हजार ५०० किलो मिटर पेक्षा अधिक असल्याचे म्हटले जाते. नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी दक्षिण व उत्तर तटावरून गोलाकार वाहत असल्याने केवळ नर्मदा नदीचीच परिक्रमा होत असून तिच्या काठावरुपन केलेल्या गोल प्रदक्षिणेला नर्मदा परिक्रमा म्हटले जात आहे.
नर्मदा ही मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहत असली तरी या नदीचा काही भाग महाराष्टÑातही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा या नदी काठाशी मोठा संबंध येतो. व प्रश्चिम वाहिन्या नद्यांपैकी प्रमुख नदी असली आहे. अमरकंटक (मध्यप्रदेश) शिखरातून तिचा उगम पावत ती सातपुडा व विंध्य पर्वतरांगेतून वाहत आहे. ही नदी अरबी समुद्रास मिळत असून नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जात असल्याने या नदीचे धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्वही आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते.
नर्मदेची परिक्रमा करणाऱ्यांना तीन-चार महिने लागतात. घनदाट जंगल असल्याने परिक्रमा करणाºया भाविकांना बरे-वाईट अनुभव येत आहे. परंतु त्यांना निसर्गरम्य वातावरणाचा सुखद आनंदही लाभत आहे. परिक्रमा करणाऱ्यांना नैसर्गिक व ताज्या फळांचाही आस्वाद घेता येत आहे. ही परिक्रमेला मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक महत्व आहे. परिक्रमा करण्याचा संकल्प केल्यास मानसिकदृष्ट्या कणखर व्हावेच लागते. बहुतांश परिक्रमावासी एकदा चालायला सुरुवात केल्यावर मागे वळून पाहायचे नसल्याचा निश्चयच करीत आहे.
या मार्गावर ठिकठिकाणी सुंदर आश्रम, धर्मशाळा असे सर्व लागत होते. कधी आश्रमात, कधी धर्मशाळेत राहणे, तिथे मिळेल ते खाणे हा रोजचा दिनक्रम झाला होता. रात्रीची जागा मिळेल तिथे, अंधारात, मंदिरात, उघड्यावर मुक्कामी थांबावे लागते. असे असले तरी परिक्रमाच्या मार्गावर ठिकठिकाणी काही स्वयंसेवी संस्थांमार्फत या भाविकांसाठी निवास व भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. नर्मदेमुळे सातपुडा व विंध्य पर्वतातील भाग निसर्गाने समृद्ध केला आहे. काही ठिकाणी परिक्रमा मार्ग शेतातूनही जात आहे. परिक्रमा करणाºयांसाठी महाराष्टÑात भोमशा, सादरी, भमाणे, सावºया बिलगाव, राजबर्डी, रोहजरी, धडगाव, सुरवाणी, कुंडल, खुंटामोडी, काठी, मोलगी, बिजरीगव्हाण, सुरगस, मोकसफाटा, वडफळी येथे निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्या-त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हे भाविकांचा प्रयत्न असतो.

पुणे आळंदी येथील दंडवत बाबा यांनी दि.१८ आॅक्टोबर २०१८ रोजी नर्मदा उगमस्थान अमरकंटकपासून दंडवत नर्मदा परिक्रमा सुरु केली होती. ही परिक्रमा त्यांनी लागोपाठ दोन वर्ष चालू ठेवली.पहिली परिक्रमाही ओंकारेश्वरपासून चालू केली ती पूर्ण झाल्यानंतर दुसरी परिक्रमा ही अमरकंठकपासून सुरु केली आहे. परमपूज्य दंडवत बाबा हे नर्मदा परिक्रमा ही आपल्या नावाप्रमाणेच दंडवत करीत पूर्ण करण्यासाठी निघाले आहेत. धडगाव शहरात पोहचण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. त्यांनी खूप मोठमोठ्या दºया खोºयासह नदी-नाल्यातून ही दंडवत नर्मदा परिक्रमा त्यांना करावी लागली. धडगाव शहरात पोहचण्यासाठी दंडवत बाबा यांना एक वर्ष एक महिना पूर्ण इतका कालावधी घालवावा लागला आहे. त्यांची दंडवत यात्रा ही पूर्ण तीन वर्षाची असून ते एका दिवसाला केवळ चार किलोमिटर दंडवत परिक्रमा करीत आहे. त्यांच्यासोबत तीन सेवेकरीही आहे.

४धार्मिकच नव्हे तर शारिरिक आरोग्यविषयक फायद्यासाठी देखील नर्मदेची भावभक्तीत परिक्रमा करण्यात येत आहे. या परिक्रमेसाठी येणाºया भाविकांसोबत धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील काही भाविकांनी देखील परिक्रमेला सुरुवात केली आहे. उतारपाडा (खुंटामोडी) येथील दत्तू तडवी, खुंटामोडीच्या अनेकांसह विरेंद्र भारती यांचा देखील समावेश आहे.
४परिक्रमातील भाविकांसाठी झालेल्या सुवधेत आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ धडगाव या संस्थेच्या शाळांचा समावेश आहे. तर ंयाच संस्थेमार्फत पिंप्रापाणी ता. अक्कलकुवा येथे सुविधा करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत तेथे सुविधा दिली जात नाही.

Web Title: Parikrama from Nandurbar district due to rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.