तळोदा प्रकल्पातर्फे पालकांची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:01 IST2019-06-22T12:01:09+5:302019-06-22T12:01:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : डाब येथील नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाच्या लेखी आदेशानंतर संबंधित ...

तळोदा प्रकल्पातर्फे पालकांची फरफट
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : डाब येथील नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाच्या लेखी आदेशानंतर संबंधित पालक आपल्या मुला-मुलींना दाखल करण्यासाठी तेथे गेले खरे, मात्र प्रकल्पाच्या भोंगळ कारभारामुळे मुलांना दाखल करण्याऐवजी परत आणण्याची नामुष्की पालकांवर आली. त्यामुळे संतप्त पालकांनी शुक्रवारी थेट प्रकल्प कार्यालय गाठून अधिका:यांनाच धारेवर धरले. त्यांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून दोन दिवसात मुलांच्या प्रवेशाची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या पालकांनी दिला.
नामांकित इंग्रजी शाळांच्या प्रवेशासाठी यंदाही तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाकडे तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील साधारण एक हजार 130 पालकांनी प्रकल्पाकडे अर्ज दाखल केले होते. ईश्वर चिठ्ठीद्वारे त्यातील 320 विद्याथ्र्याची निवड करण्यात आली. साहजिकच इतर विद्यार्थी इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून व पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे असलेला वाढता कल लक्षात घेऊन नाशिक आदिवासी विकास आयुक्तालयाने यातील 40 विद्याथ्र्यासाठी तळोदा प्रकल्पातील डाब येथे यंदा नामांकित इंग्रजी शाळा सुरू करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार प्रकल्पानेही आपल्या कार्यक्षेत्रातील डाब, ता.अक्कलकुवा येथील शासकीय आश्रमशाळेतील दोन-तीन खोल्यात ही शाळा चालविण्याचे नियोजन करून 11 जून रोजी 40 विद्याथ्र्याची निवड केली. शिवाय 14 तारखेला संबंधित पालकांना मुलांच्या प्रवेशाचे आदेशही पाठविण्यात आले. 20 जून 2019 पावेतो आपल्या पाल्याचा प्रवेश शाळेत निश्चित करण्याचे आदेशात सूचित केले होते. मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. आपल्या मुलाची इंग्रजी शाळेत निवड झाल्याने साहजिक आनंदी झालेल्या या पालकांनी मुलांना गुरुवारी प्रत्यक्ष पहिलीच्या प्रवेशासाठी डाब येथे नेले. मात्र तेथे मुलांना शाळेत दाखल करण्यापूर्वीच पाल्यांना परत आणावे लागल्याची नामुष्की पालकांवर आली. कारण शाळेवर मुलांना दाखल करून घेण्यासाठी कुणीही स्वतंत्र शिक्षक वा कर्मचारी नव्हते. लहान बालकांना सांभाळण्याची जबाबदारी कोण घेईल असे म्हणत त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनीही पालकांनी लेखी देऊन टाकले. शिवाय मुलांना दाखल करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे संतप्त पालकांनी शुक्रवारी सकाळी थेट प्रकल्प कार्यालय गाठून शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी शैलेश पाटील व सुवर्णा सोलंखी यांची भेट घेतली. या वेळी पालकांनी शाळेबाबतच्या शून्य नियोजन व गलथान कारभाराबाबत अधिका:यांना चांगलेच सुनावले. आदिवासी विद्याथ्र्याच्या शिक्षणाबाबत प्रकल्पाने खेळखंडोबा लावल्याचा आरोपही पालकांनी केला. या अधिका:यांनी पालकांची समजूत काढून मंगळवार्पयत शाळेत संपूर्ण सुविधा उपलब्ध करून विद्याथ्र्याचे प्रवेश सुरळीत करण्याचे आश्वासन पालकांना दिले. या वेळी तळोदा पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत ठाकरे, सायसिंग वळवी, विलास गावीत, वीरेंद्र वसावे, तिरसिंग पाडवी, छोटूलाल पावरा, कालूसिंग राहसे, भारत खर्डे, महेश वळवी, विकास पाडवी, अंकीत वळवी, दिनेश पावरा, कुशा राऊत, शिवाजी ठाकरे, संभाजी पाडवी, सुरत्या वळवी, रमेश पावरा, कांतीलाल तडवी, झोमया वसावे, नरशी पाडवी, विज्या तडवी, अभिमन वळवी, ना:या तडवी, सौद्या वसावे, दातक्या वसावे आदी पालक उपस्थित होते.