शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

‘डावणी’च्या प्रादुर्भावाने पपई उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या कालावधीत ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पपईची फुलगळ होत आहे. फळधारणेवर त्याच्या परिणाम होत असल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतक:यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पपई या पिकासाठी उत्पन्न निघेर्पयत मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागतो. यावर्षी शेतक:यांनी 14 रुपयांपासून  ते 25 रुपयार्पयत पपईच्या रोपांची  खरेदी  करून लागवड केली आहे. शिवाय उन्हाच्या तीव्रतेने ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तीन ते चारवेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. त्याला उन्हाच्या संरक्षणापासून क्रॉप कव्हर लावण्यात आले. ते क्रॉप कव्हर प्रती झाड तीन ते चार रुपये खर्च आला. तसेच महागडे रासायनिक खत वेगवेगळ्या कंपन्यांचे स्प्रे त्यात व्हायरस मिलीबगसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सहाजिकच खर्चाचे प्रमाण वाढले. दरवर्षी पपईचा दर कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने दर कमी झाल्यावर शेतक:याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे हे पीक परवडेनासे झाले आहे. पपईचे पीक दरवर्षी वादाच्या भोव:यात सापडते. कधी व्यापा:यांकडून कमी दर दिला जातो तर कधी नैसर्गिक संकट यावर्षी सुरुवातीलाच निसर्गाच्या संकटाने शेतकरी हैराण झाला असून कसेबसे उधारउसनवार पैसे करून पीक घेत आहेत. काही शेतक:यांनी तर कूपनलिका आटल्याने उभे पीक मोडून काढले. ज्या शेतक:यांचे पपईचे पीक  तग धरून उभे आहे त्यावर सध्या ‘रिक्षा’ नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मार्गदर्शनाची गरज आहे. कृषी विभागाने गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे.ज्या शेतक:यांनी एप्रिल महिन्यात पपईची लागवड केली आहे हे ते पीक  सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. त्या पिकाला सध्या ‘डावणी’ रोगाने                पछाडले आहे. यात झाड पिवळे पडणे, झाडाची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार घडत आहेत. पपई पीक हे मुख्यत: पानांच्या छत्रीवरच अवलंबून असते. या पिकात पानांची छत्री गेल्यास झाडच कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात सावली नसल्याने फळांवर उष्णतेचे चटके बसल्याने फळ खराब होऊन आर्थिक नुकसान होते. शिवाय व्यापारीहीही माल घेत नसल्याने शेतक:यांचे नुकसान होते. कृषी विभागाने वेळीच दखल घेऊन समस्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.