‘डावणी’च्या प्रादुर्भावाने पपई उत्पादक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:06 IST2019-09-15T12:06:27+5:302019-09-15T12:06:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या ...

‘डावणी’च्या प्रादुर्भावाने पपई उत्पादक चिंतेत
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या कालावधीत ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पपईची फुलगळ होत आहे. फळधारणेवर त्याच्या परिणाम होत असल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतक:यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
पपई या पिकासाठी उत्पन्न निघेर्पयत मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागतो. यावर्षी शेतक:यांनी 14 रुपयांपासून ते 25 रुपयार्पयत पपईच्या रोपांची खरेदी करून लागवड केली आहे. शिवाय उन्हाच्या तीव्रतेने ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तीन ते चारवेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. त्याला उन्हाच्या संरक्षणापासून क्रॉप कव्हर लावण्यात आले. ते क्रॉप कव्हर प्रती झाड तीन ते चार रुपये खर्च आला. तसेच महागडे रासायनिक खत वेगवेगळ्या कंपन्यांचे स्प्रे त्यात व्हायरस मिलीबगसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सहाजिकच खर्चाचे प्रमाण वाढले.
दरवर्षी पपईचा दर कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने दर कमी झाल्यावर शेतक:याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे हे पीक परवडेनासे झाले आहे. पपईचे पीक दरवर्षी वादाच्या भोव:यात सापडते. कधी व्यापा:यांकडून कमी दर दिला जातो तर कधी नैसर्गिक संकट यावर्षी सुरुवातीलाच निसर्गाच्या संकटाने शेतकरी हैराण झाला असून कसेबसे उधारउसनवार पैसे करून पीक घेत आहेत. काही शेतक:यांनी तर कूपनलिका आटल्याने उभे पीक मोडून काढले. ज्या शेतक:यांचे पपईचे पीक तग धरून उभे आहे त्यावर सध्या ‘रिक्षा’ नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मार्गदर्शनाची गरज आहे. कृषी विभागाने गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे.
ज्या शेतक:यांनी एप्रिल महिन्यात पपईची लागवड केली आहे हे ते पीक सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. त्या पिकाला सध्या ‘डावणी’ रोगाने पछाडले आहे. यात झाड पिवळे पडणे, झाडाची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार घडत आहेत. पपई पीक हे मुख्यत: पानांच्या छत्रीवरच अवलंबून असते. या पिकात पानांची छत्री गेल्यास झाडच कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात सावली नसल्याने फळांवर उष्णतेचे चटके बसल्याने फळ खराब होऊन आर्थिक नुकसान होते. शिवाय व्यापारीहीही माल घेत नसल्याने शेतक:यांचे नुकसान होते. कृषी विभागाने वेळीच दखल घेऊन समस्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.