गुणवत्तावाढीसाठी पंचसूत्री जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:35+5:302021-06-16T04:40:35+5:30
नंदुरबार : कोरोनाकाळात गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम घेण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने पंचसूत्री जारी केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शाळा ...

गुणवत्तावाढीसाठी पंचसूत्री जारी
नंदुरबार : कोरोनाकाळात गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम घेण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने पंचसूत्री जारी केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शाळा मुख्याध्यापकांना पत्र देण्यात आले आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांच्या संकल्पनेतून ही पंचसूत्री तयार करण्यात आली असू,न त्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास नक्कीच गुणवत्तावाढीसाठी फायदा होईल, अशी अपेक्षा कदम यांनी व्यक्त केली आहे.
पंचसूत्रीतील पहिले सूत्र हे ‘शाळा आपल्या दारी, ज्ञानगंगा घरोघरी’ हे आहे. सर्व विद्यार्थ्यांची नोंद ठेवणे, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भेटीद्वारे अध्ययन व अध्यापन आढावा व आठवडा तसेच मासिक भेटी घेऊन मार्गदर्शन करणे, व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करणे.
दुसरे सूत्र ‘गृहाभ्यासातून ज्ञानकण वेचणे’ हे आहे. त्यात घटकसंच नियोजन, शब्द, शब्दार्थ, वाक्य, म्हणी, सुविचार, वाक्यप्रचार, गणितीय पाढे, सूत्रांचा उपयोग, रासायनिक अभिक्रिया, संयुगे, गृहप्रात्याक्षिके, व्याख्या, वाचन आदी.
तिसरे सूत्र ‘विविध कृतिनिर्मिती कौशल्यातून आनंद ज्ञानप्राप्तीचा’ हे असून विविध शब्दखेळ, शब्दकोडी, प्लॅशकार्ड, तयार करणे, कृतियुक्त खेळ, भाषा, विज्ञान, संख्याशास्त्र, गणित विषयातील कृती सोडवून हसत-खेळत शिकणे.
चौथे सूत्र हे ‘वाटचाल करूया आकृतीकडून कृतिशीलतेकडे, चित्रातून प्रात्यक्षिकांकडे’ आहे. त्यात विविध आकृत्या काढणे, चित्र काढून रंगकाम करणे, विज्ञान प्रदर्शनाकरिता प्रकल्पनिर्मितीसाठी विचार करणे, कार्यानुभव, हस्तकला वस्तू तयार करणे.
तर पाचवे सूत्री ‘वाचन, गायन, पठण करूया, आनंददायी अध्ययनाची कास धरूया’ हे आहे.