खराब पीक काढल्याने पंचनाम्यांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:28 IST2019-11-07T12:27:18+5:302019-11-07T12:28:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अवकाळी पावसामुळे हातून गेलेल्या पिकाचे नैराश्य मागे टाकून शहादा तालुक्यातील बरेच शेतकरी रब्बीच्या तयारीला ...

Panchanamas confused with poor crop removal | खराब पीक काढल्याने पंचनाम्यांचा गोंधळ

खराब पीक काढल्याने पंचनाम्यांचा गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : अवकाळी पावसामुळे हातून गेलेल्या पिकाचे नैराश्य मागे टाकून शहादा तालुक्यातील बरेच शेतकरी रब्बीच्या तयारीला लागले आहेत़ त्यांच्या या तयारीमुळे आधीच गोंधळात सुरु असलेल्या पंचनाम्यांचा गोंधळ आणखी वाढला आह़े ब:याच शेतक:यांनी पथकांनी पंचनाम्यांना हजेरी न लावल्याने रब्बीची तयारी केल्याने पथक पंचनामे करणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े
अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यातील सारंगखेडा, कु:हावद, कौठळ, पुसनद, अनरद, कळंबू, कुकावल, कोठली, टेंभा, देऊर या गावांच्या शिवारातील शेतीचे मोठे नुकसान झाले होत़े मका, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद आणि पपईसह विविध फळबागा पूर्णपणे झोपून गेल्या आहेत़ या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री रावल, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी स्वतंत्र दौरे करुन पाहणी केली होती़ यानंतर पंचनाम्यांना वेग येण्याची अपेक्षा होती़ परंतू तसे न घडल्याने ‘आशावादी’ असलेल्या शेतक:यांनी रब्बीसाठी शेत तयार करण्यास सुरुवात केली आह़े खराब झालेले पीक बांधावर ठेवून शेतमशागत करत शेतकरी रब्बीत भरपाई काढण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत़ त्यांच्या प्रयत्नांमुळे पंचनामे करणारे गोंधळात पडत असून यामुळे या भागात सरसकट सातबा:यांवरुन पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आह़े 


शेतशिवारातील खरीप पिकांसोबतच पेरु, बोर, पपई या फळपिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतक:यांना आर्थिक फटका बसला आह़े 
ज्या ठिकाणी अवकाळीत फळझाडे शिल्लक राहिली त्याठिकाणी आता कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आह़े 
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने चांगली हजेरी दिली असल्याने अनेक शेतक:यांनी कर्जाऊ पैसे घेत स्वत:च्या क्षेत्रासह इतर ओळखीच्यांचे क्षेत्र भाडय़ाने घेत पेरण्या केल्या होत्या़ यासाठी उधार-ऊसनवार आणि व्याजाने पैसे घेतले होत़े आता नुकसानीमुळे हे पैसे परत करावे कसे असा, प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आह़े यातून शेतकरी कजर्बाजारी झाले आहेत़ 
 

Web Title: Panchanamas confused with poor crop removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.