खापर येथे पालखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:11 IST2020-02-08T13:11:26+5:302020-02-08T13:11:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील रमाई महिला मंडळातर्फे माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात ...

Palanquin procession at Khapar | खापर येथे पालखी मिरवणूक

खापर येथे पालखी मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील रमाई महिला मंडळातर्फे माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली़ यानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आले होते़
शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात खापर येथील समाजबांधव व महिलांची उपस्थिती होती़ प्रारंभी पालखीचे पूजन सरपंच करूणाबाई वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जि.प. सदस्य भूषण कामे, उपसरपंच विनोद कामे, ग्रा.पं. सदस्य देवीदास वसावे, विद्याबाई कापुरे, दक्षाबाई वसावे, प्रियंका अग्रवाल, निर्मला पाडवी, किरण पाडवी, ग्रामविकास अधिकारी विनोद ढोडरे, अरविंद अग्रवाल, बापू गवळे उपस्थित होते. प्रास्ताविक मधुकर कापुरे यांनी केले. आतिष गायकवाड, युवराज साळवे, प्रमिला बागले यांनी मनोगत व्यक्त केले तर रोशनी अहिरे या चिमुकलीने कविता सादर केली. कार्यक्रमासाठी जयंती उत्सव समितीचे धनराज पवार, कमलेश पवार, शशिकांत नगराळे, सागर कापुरे, प्रकाश कापुरे, राकेश कापुरे, उद्देश कापुरे, बंटी नगराळे, महिला मंडळाच्या विद्या कापुरे, प्रमिला बागले, संजना साळवे, मनिषा साळवे, सुमन कापुरे, मंगला कापुरे, सारिका पवार, बेबीबाई पवार, पायल पवार, ममता पवार, अमिषा साळवे, संजना पवार आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Palanquin procession at Khapar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.