बिलाडी परिसरात बिबट्याच्या जोडीचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:15+5:302021-02-05T08:11:15+5:30

शहादा तालुक्यातील बिलाडी, ससदे, कुऱ्हावाद, कवठळ परिसरात रस्त्यालगत असलेल्या उसाच्या शेतात आठवडाभरापासून बिबट्याच्या जोडीचा मुक्तसंचार वाढला आहे. त्यात बिलाडी ...

A pair of leopards live in the cat area | बिलाडी परिसरात बिबट्याच्या जोडीचे वास्तव्य

बिलाडी परिसरात बिबट्याच्या जोडीचे वास्तव्य

शहादा तालुक्यातील बिलाडी, ससदे, कुऱ्हावाद, कवठळ परिसरात रस्त्यालगत असलेल्या उसाच्या शेतात आठवडाभरापासून बिबट्याच्या जोडीचा मुक्तसंचार वाढला आहे. त्यात बिलाडी त.सा. येथील शिवदास रोहिदास सोनवणे, मुन्ना धनसिंग सोनवणे, गोरख रामसिंग सोनवणे व राजू जयसिंग सोनवणे यांच्या सहा शेळ्या फस्त केल्या आहेत. दिवस या शेळ्या चारणीवर असताना कळपातून हल्ला करून पळवल्या तर काहींच्या गावातून रात्रीच्यावेळी फस्त केल्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. आठ दिवसांपासून सतत बिबट्याची जोडी बिलाडी येथील श्याम शंकर पाटील, बामखेडा त.सा. येथील शेतकरी पी.यू. पाटील यांना दिवसाढवळ्या आढळल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सतत शेळ्यांवर हल्ला सुरू आहे. त्यांनी गावात शिरून मानवावर हल्ला केला तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे? रात्रीच्यावेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी मजूर येत नाहीत. सध्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे बिबटे मजुरांना दिसत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मजूर शेतीकाम करण्यासाठी नकार देत असल्याने शेतीकामे ठप्प झाल्याने त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. बिलाडी त.सा. परिसरासह बिबट्याच्या जोडीचे वास्तव्य असल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत पोलीस पाटील ईश्वर पाटील यांनी वनविभाग व पोलीस प्रशासन यांना कळवले आहे. वनविभागाने बिबट्यांचा पिंजरे लावून जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून शेळ्या-मेंढ्या जंगलात चरायला नेल्यानंतर सावधानता बाळगावी. शेतकरी व शेतमजुरांनीही दक्षता घ्यावी. ग्रामपंचायतीमार्फत वनीकरण विभाग व पोलीस स्टेशन यांना सूचित करण्यात आले आहे.

-राजेश शिरसाठ, पोलीस निरीक्षक, सारंगखेडा पोलीस स्टेशन.

बिबट्याची जोडी शेतीशिवारात फिरत असल्याचे ग्रामस्थांकडून कळाल्यानंतर वनविभागाला त्वरित कळविले असून ग्रामस्थांनी शेतात व बाहेर पडताना सावधानता बाळगावी.

-ईश्वर पाटील, पोलीस पाटील, बिलाडी त.सा.

Web Title: A pair of leopards live in the cat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.