साक्षरता पंधरवडानिमित्त चित्रकला प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:37 IST2021-09-16T04:37:58+5:302021-09-16T04:37:58+5:30

प्रकाशा : येथील सर्वोदय विद्या मंदिरात साक्षरता पंधरवडा दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शिकलेली आई ...

Painting exhibition on the occasion of Literacy Fortnight | साक्षरता पंधरवडानिमित्त चित्रकला प्रदर्शन

साक्षरता पंधरवडानिमित्त चित्रकला प्रदर्शन

प्रकाशा : येथील सर्वोदय विद्या मंदिरात साक्षरता पंधरवडा दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शिकलेली आई घरा दाराला पुढे नेई असा संदेश चित्रकलेतून विद्यार्थ्यांनी दिला.

१ ते १५ सप्टेंबर ‘साक्षरता पंधरवडा’ निमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, यांच्या सूचनेनुसार शाळेचे प्राचार्य एस.पी. पाटील, उपमुख्याध्यापक डी.टी. चौधरी, पर्यवेक्षक चंद्रकांत पटेल यांचा मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक नरेंद्र गुरव यांनी पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी साक्षरता या विषयावर ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती तर आठवी ते १० वीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी उत्कृष्ट चित्रांचे शाळेत प्रदर्शन भरवण्यात आले. त्याचे उद्घाटन प्राचार्य एस.पी. पाटील यांनी केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना लवकरच बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी दीपक निकुंभ, दीपक कोकणी, वैकुंठ पाटील, राजेंद्र पाटील, संजय मकवाना, विष्णू जोधळे, सुरेश जाधव, आत्माराम भोई, आदींनी सहकार्य केले.

हे प्रदर्शन तीन दिवस सुरू राहणार आहे.

Web Title: Painting exhibition on the occasion of Literacy Fortnight