तळोद्यात आमचूर बनविण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:09 IST2018-05-09T13:09:12+5:302018-05-09T13:09:12+5:30

तळोदा तालुका : रोजगार उपलब्ध, धडगाव मोलगी येथील बाजारपेठेत विक्री

The pace at which Amchur has been built in Pulod | तळोद्यात आमचूर बनविण्याच्या कामाला वेग

तळोद्यात आमचूर बनविण्याच्या कामाला वेग

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 9 : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्याजवळील अनेक गावांमध्ये सध्या आंब्यापासून आमचूर बनविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील  मजुरांना रोजगार उपलब्ध झाला  आहे.
तळोदा तालुक्यातील वरपाडा, रोझवा पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसन, पाडळपूर परिसरात शेतातील बांध तसेच घराभोवती लागवड केलेल्या आंब्यांना यंदा 50 टक्के बहर आला आहे. आंबा उत्पादक शेतक:यांकडून स्वत:च आमचूर बनवून विक्री करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
शेतक:यांकडून सकाळच्या वेळी कच्च्या कै:या तोडण्यात येतात. त्यानंतर दिवसभरात विळ्याच्या सहाय्याने चकत्या करण्यात येवून त्यांना वाळवण्यात येत आहे. तद्नंतर शेतक:यांकडून धडगाव व मोलगी  येथील बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात येत आहेत. 120 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने आमचूर घेण्यात येत असल्याने शेतक:यांना ब:यापैकी  पैसे मिळत आहेत.
दरम्यान, सध्या उन्हामुळे  चांगलेच तापत असल्याने शेतीकामेही बंद आहेत. शेतकरी आपापल्या आंब्याच्या झाडांच्या सावलीत आपल्या कुटुंबासमवेत आमचूर बनवण्यात व्यस्त असल्याच चित्र सातपुडा परिसरात दिसून येत आहे.
 

Web Title: The pace at which Amchur has been built in Pulod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.