पी. जी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे टॅलेंट हंट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:35+5:302021-06-02T04:23:35+5:30
पी. जी. ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटने कोरोना काळात पालकांना व नागरिकांना दिलासा म्हणून नंदुरबार टॅलेंट हंट या फ्री कॉम्पिटिशनचे आयोजन ...

पी. जी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे टॅलेंट हंट स्पर्धा
पी. जी. ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटने कोरोना काळात पालकांना व नागरिकांना दिलासा म्हणून नंदुरबार टॅलेंट हंट या फ्री कॉम्पिटिशनचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन १२ व १३ जूनला करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी १ ते १० जूनदरम्यान करावयाची आहे. तरी सर्व नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पी. जी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन पुष्पेंद्र रघुवंशी यांनी केले आहे. यावेळी विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व ट्राॅफी स्वरूपात गौरविले जाईल.
उद्घाटनाला जिल्हाधिकारी डॉ. भारूड तसेच प्राचार्य पी. जी. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च चौपाळेचे प्राचार्य आर. ए. अहिरराव, पी. जी. पब्लिक स्कूलचे प्राचार्य आनंद परदेशी, श्रवण लोदी तसेच गायत्री रघुवंशी हे उपस्थित होते.