तळोदा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:13+5:302021-04-17T04:30:13+5:30
सध्या कोरोना महामारीने प्रचंड अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्ण संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातही गंभीर ...

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार
सध्या कोरोना महामारीने प्रचंड अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्ण संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातही गंभीर रुग्णांची आकडेवारी वढली आहे. त्यांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनची मात्रा कमी पडू नये म्हणून आमदार राजेश पाडवी यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील रुग्णांची माहिती घेतली. शिवाय सुविधांचाही आढावा घेतला होता. त्यावेळी ऑक्सिजनच्या पुरेशा पुरवठ्याबाबत त्यांना माहिती मिळाली. यावर त्यांनी ठोस उपाययोजना होण्यासाठी तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयातच सुसज्ज असा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आपल्या आमदार फंडातून ४० लाखांचा निधीही उपलब्ध करून देणार आहेत. कोरोनाने गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. आता आमदार पाडवी यांनी थेट ऑक्सिजन प्लांटच उभारण्याचे नियोजन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, तळोद्यानंतर शहादा येथेही असा ऑक्सिजन प्लांट लवकरच उभारणार असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले.