जिल्हास्तरीय बैठकीत विविध योजनांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:45 IST2020-02-02T12:14:41+5:302020-02-02T12:45:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पीएम किसान योजना, शेतकरी कर्जमुक्ती योजना, अवकाळी पाऊस पिक कर्ज माफी योजना, शासकीय वसुली ...

जिल्हास्तरीय बैठकीत विविध योजनांचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पीएम किसान योजना, शेतकरी कर्जमुक्ती योजना, अवकाळी पाऊस पिक कर्ज माफी योजना, शासकीय वसुली आदी विषयांचा आढावा जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड होते.
बैठकीस प्रभारी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, मिलींद कुलकर्णी, ज्ञानेश्वर सपकाळे, नायब तहलिदार आर.एम. राठोड, राजेंद्र नजन, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी धमेंद्र जैन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ए. जी. चाळक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील, गट विकास अधिकारी एन. डी. वाळेकर, सी.टी. गोस्वामी आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी सांगितले, पीएम किसान योजनेबाबत ज्या तालुक्यांत आधार प्रमाणिकरणाची कामे प्रलंबित असतील त्यांनी त्वरीत डाटा दुरुस्त करुन अपलोड करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांक मिळवून त्यांच्या खात्यात मदत निधी त्वरीत वितरीत करावा. पिक कर्जमाफी योजनेसाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंकसाठी सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी युध्दपातळीवर कामकाज करावे. सहकार विभागातील कर्मचाºयांनी ही कर्ज मुक्तीची कामे तातडीने पुर्ण करावी. पी.एम.किसानमध्ये ज्यांची नावे नसतील त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी यावेळी दिल्या. तसेच शासकीय वसुली, प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र या विषयावरही चर्चा करुन आढावा घेतला.