जिल्हास्तरीय संघटनात्मक निवडणुकीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:16 IST2020-02-04T12:16:28+5:302020-02-04T12:16:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुठल्याही निवडणुका जिंकायच्या असतील तर त्या अगोदर पक्षाचे संघटन मजबुत होणे आवश्यक असुन, पदाधिकारी ...

जिल्हास्तरीय संघटनात्मक निवडणुकीचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कुठल्याही निवडणुका जिंकायच्या असतील तर त्या अगोदर पक्षाचे संघटन मजबुत होणे आवश्यक असुन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुथ अधिकाधिक सक्षम करावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.
भाजपचा संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारातील श्रीरामवाडीत शहर व तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्या प्रसंगी चौधरी बोलत होते. यावेळी आमदार विजयकुमार गावित, सरचिटणीस राजेंद्र गावित, निलेश माळी, राजेंद्रकुमार गावित, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, तालुकाध्यक्ष रविंद्र गिरासे, पंचात समिती सभापती प्रकाश गावित आदी उपस्थित होते.
विजय चौधरी यांनी सांगितले, पक्षाच्या संकल्पनेतुन बुथ समितीत एक अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस, तीन चिटणीस व २२ सदस्यांची कार्यसमिती अपेक्षित असते. जिल्हयात आगामी काळात शतप्रतिशत बुथ रचना प्रभावीपणे उभी करुन पक्षाला अभिप्रेत असलेले कार्य उभे करुन कार्यकर्त्यांनी जबाबदारी पार पाडावी असेही चौधरी यांनी सांगितले.
आमदार डॉ.विजयकुमार गावीत म्हणाले, बुथ रचना हा भाजपाचा महत्वाचा भाग आहे. बुथ रचना उत्तम असल्यास वेगवेगळे विकासकामे व निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीकोनातुन फायदा होतो. त्यामुळे आगामी काळात पक्षाचे संघटन उभे राहण्याच्या दृष्टीकोनातुन सगळयांनी बुथ रचना सक्षम करावी असे गावीत यांनी आवाहन केले.
जिल्हा परीषद निवडणुकीमध्ये पक्षाचे संघटन मजबुत असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला व उमेदवाराला फायदा झाला असे देखील त्यांनी नमुद केले. याप्रसंगी बैठकीत शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.