क्षमतेपेक्षा अधिक माल भरणा:या वाहनावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:41 IST2019-08-19T12:41:32+5:302019-08-19T12:41:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बेडकी येथील सीमा तपासणी नाक्यावर जादा माल वाहून नेणा:या पीक चालकावर कारवाई ...

Overloading capacity: Action on this vehicle | क्षमतेपेक्षा अधिक माल भरणा:या वाहनावर कारवाई

क्षमतेपेक्षा अधिक माल भरणा:या वाहनावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बेडकी येथील सीमा तपासणी नाक्यावर जादा माल वाहून नेणा:या पीक चालकावर कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला़ 16 रोजी तपासणी दरम्यान पीकअप वाहनात जादा माल दिसून आला़ 
बेडकी येथील सीमा तपासणी नाक्यावर 16 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास एमएच 41 एजी 4547 हे वाहन आल्यानंतर त्याची अधिकारी तपासणी करत असताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक माल भरलेला आढळून आला़ चालकाची चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात आली़ याबाबत मोटार वाहन निरीक्षक संदीप सुभाष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किरण साहेबराव शेवाळे रा़ तेरे ता़ मालेगाव जि़ नाशिक याच्याविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्तीस नुकसान पोहोचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत़ बेडकी आणि अक्कलकुवा तालुक्यातील गुलीउंबर येथील तपासणी नाक्यावर गत सहा महिन्यात आठ ते दहा वाहनांवर कारवाई झाली आह़े 
 

Web Title: Overloading capacity: Action on this vehicle