नियमांचे पालन केल्याने कोरोनावर लवकर मात - डॉ. मालविका कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST2021-04-13T04:29:12+5:302021-04-13T04:29:12+5:30

काही प्रामुख्याने आढळून येणारे मुद्दे - ‘प्रिव्हेन्शन ईज बेटर देन क्यूआर’, हे सध्याचे ब्रीदवाक्य आहे. विनाकारण घराबाहेर पडून, मास्क ...

Overcoming Corona early by following the rules - Dr. Malvika Kulkarni | नियमांचे पालन केल्याने कोरोनावर लवकर मात - डॉ. मालविका कुलकर्णी

नियमांचे पालन केल्याने कोरोनावर लवकर मात - डॉ. मालविका कुलकर्णी

काही प्रामुख्याने आढळून येणारे मुद्दे - ‘प्रिव्हेन्शन ईज बेटर देन क्यूआर’, हे सध्याचे ब्रीदवाक्य आहे. विनाकारण घराबाहेर पडून, मास्क न घालण्यात कसलेही शौर्य नाही. जगभरात ज्या समाजाने मास्क घालणे व हात वारंवार धुणे ह्या सूचना पाळल्या, तिकडे कोरोनावर लवकर मात करता आली आहे.

व्हॅक्सीन घेतल्यावर, कोरोनाची तीव्रता खूप कमी होते, हे आता स्पष्ट झाले आहे. व्हॅक्सीन घेतल्यावर १४ दिवसांनंतर आपल्याला आजाराच्या तीव्रतेपासून संरक्षण प्राप्त होते व त्यानंतरही मास्क घालणे गरजेचे आहे. घरात लहान बाळ किंवा गर्भवती स्त्री आजारी झाल्यावर म्हणजेच (ताप, सर्दी, जुलाब, उलटी) त्यांना घरातील वेगळ्याच खोलीत ठेवणे व प्रौढ लोकांनी वेगळ्या खोलीत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. कमीत कमी सात ते १० दिवस व कोरोना तपासणी ‘पॉझिटिव्ह’ असेल तर १४ दिवसांनंतर वेगळे राहावे. लहान बाळ दोन दिवसानंतर खेळायला लागते, पण त्यांना घेऊन फिरल्यामुळे आजी-आजोबा गंभीररित्या आजारी पडतात. वयस्कर लोकांनी स्वतःला जपले पाहिजे.

रोज घरातल्या घरात व्यायाम, प्राणायाम करणेही अत्यंत गरजेचे आहे. ताप, सर्दी असल्यास त्वरित कोरोनासाठी स्वॅब देऊन उपचार घेतले व स्वत:ला वेगळे ठेवलेत तर आपण आपल्या प्रियजनांना सुखरूप ठेवू शकू.

(लेखिका शहादा येथील बालरोगतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Overcoming Corona early by following the rules - Dr. Malvika Kulkarni