शहाद्याबाहेरील चौफुली ठरताय जीवघेण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:11 IST2018-11-13T12:11:46+5:302018-11-13T12:11:52+5:30
उपाययोजनेची अपेक्षा : वाढते अतिक्रमण व रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनधारक हैराण

शहाद्याबाहेरील चौफुली ठरताय जीवघेण्या
शहादा : शहरालगत लोणखेडा बायपास रस्त्यालगत रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. रस्ता मोकळा झाल्याने वाहनधारकांचा त्रास कमी झाला. मात्र डोंगरगाव व मोहिदा फाटा या दोन ठिकाणी वाढणारे अतिक्रमण वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे.
शहादा शहराच्या पूव्रेला लोणखेडा बायपास रस्त्याजवळ कोळदा ते सेंधवा दरम्यान होणारे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दोंडाईचा रस्ता ते दरा फाटार्पयतचे रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रस्ता रुंद झाल्याने वाहनधारकांसाठी सोयीचा झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्याही वाढली आहे. याच रस्त्यावर डोंगरगाव रस्ता, शहराकडे येणारा रस्ता, दोंडाईचा रस्ता व जुना मोहिदा रस्त्यालगत अतिक्रमण वाढू लागले आहे. हे अतिक्रमण वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत असून डोंगरगाव रस्ता व मोहिदा फाटा याठिकाणी गेल्या दोन वर्षात चार जणांना प्राणास मुकावे लागले आहे.
डोंगरगाव व शहाद्याकडे येताना रस्ता ओलांडताना वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. चारही दिशेने ये-जा करणा:या लहान-मोठय़ा वाहनांना याठिकाणी वाढणारे अतिक्रमण अडचणीचे ठरत आहे. त्यातच रस्ता चढ-उताराचा असल्याने त्यात भर पडते. जुना मोहिदाकडे जाणा:या रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. याठिकाणी दुचाकीस्वार घसरून जखमीही होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे 200 मीटर अंतरार्पयत खडी असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ही खडी मोठय़ा वाहनांच्या टायरखाली येऊन उधळते. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचारी जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शहराबाहेरील सर्वच चौफुलींवरील अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीयोग्य करण्याची अपेक्ष वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहादा शहराबाहेरून बायपास रस्त्याने वाहतूक वाढल्याने अवजड वाहनांसह लहान वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे या चौफुली परिसरातील रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम करण्याची गरज आहे. नवीन रस्ते तयार झाले तर होणारे अपघात टाळता येतील. तसेच वाहनधारकांना वाहने चालविताना होणारा त्रासही कमी होणार आहे.