मिरचीवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:59 IST2020-08-20T12:59:08+5:302020-08-20T12:59:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा तालुक्यात सुमारे ७५० हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी ...

Outbreaks of viral diseases on peppers | मिरचीवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव

मिरचीवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा तालुक्यात सुमारे ७५० हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी तालुक्यातील अनेक भागात मिरची पिकावर विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. फवारणी करूनही विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आता मिरची झाडे काढून फेकण्या शिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
तालुक्यात गेल्या सात ते आठ दिवसापासून पावसाच्या लहरीपणामुळे मिरची, मूगासह इतर पीक पावसाच्या माºयामुळे नाशवंत झालेली आहेत. मिरची लागवडीनंतर पिकाची चांगल्या प्रकारे वाढ सुरू झाली होती. या झाडांना मिरची लागवड सुरू झाली होती. मिरचीचे झाड वाकू नये याकरिता शेतकऱ्यांनी लहान-लहान बांबूंचा आधार दिला आहे. याच सोबत मिरचीवर रोगराई येऊ नये याकरिता शेतकºयांनी उच्चप्रतीची फवारणीदेखील केली आहे. मात्र मिरचीवर पडणाºया व्हायरसचा विचार करून कंपन्यांकडून विविध संशोधन करून व्हायरस फ्री वाणाचा दावा करण्यात येत असतो. शेतकºयांनी या वाणाच्या रोपांची खरेदी एक ते दीड रूपये प्रती रोप प्रमाणे केली. शेतात झाड लावल्यानंतर पूर्ण पीक येईपर्यंत एका झाडाला ७०० ते ८०० ग्रॅम मिरची लागवड होत असते. मिरची तोड झाल्यानंतर व्यापारी हा शेतकºयांकडून १२ रूपये किलो दराने होलसेल भावात खरेदी करत असतो. व्यापारी वर्ग रिटेल विक्रेत्यांना २५ रूपये किलो दराने मिरची विकत असतात. हेच रिटेल विक्रेते ग्राहकांना ४० रूपये किलो दराने मिरची विकत असतात. शेतकरी मिरची लागवडीपासून तर ते उत्पन्न निघेपर्यंत शेतात राबराब राबत असतो. लागवडीपासून फवारणी करणे, निंदणी करणे, त्याची तोड करणे याकरिता त्याला एकरी ५० हजार रूपये खर्च येतो. मात्र या वर्षी व्हायरस फ्री खरेदी केलेल्या वाणावर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकºयांसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. मोठ्या प्रमाणात फवारणी केल्यानंतर ही रोग आटोक्यात येत नसल्याने अनेक शेतकºयांनी मिरची काढून फेकण्याचा पर्याय निवडला आहे.

Web Title: Outbreaks of viral diseases on peppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.