७६ पैकी ७१ सरपंचपद खुले व ओबीसींसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:57+5:302021-02-05T08:09:57+5:30
नंदुरबार : नंदुरबार व शहादा तालुक्यातील पेसा क्षेत्राबाहेरील ७६ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती या एस.टी. प्रवर्ग तर तीन ग्रामपंचायती या ...

७६ पैकी ७१ सरपंचपद खुले व ओबीसींसाठी राखीव
नंदुरबार : नंदुरबार व शहादा तालुक्यातील पेसा क्षेत्राबाहेरील ७६ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती या एस.टी. प्रवर्ग तर तीन ग्रामपंचायती या एस.सी.प्रवर्गासाठी राखीव असून उर्वरित सर्व ग्रामपंचायती या खुला व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव राहणार आहेत. आता यातून महिलांसाठीचे आरक्षण ४ फेब्रुवारी निघणार आहे.
२०२५ पर्यंत मुदत असणाऱ्या शहादा व नंदुरबार तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी नंदुरबार व शहादा तहसील कार्यालयात काढण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील ४१ तर शहादा तालुक्यातील ३५ गावांचा त्यात समावेश आहे. नंदुरबार तालुक्यातील न्याहली ही ग्रामपंचायत एस.टी.प्रवर्गासाठी तर जूनमोहिदा ही एस.सी.प्रवर्गासाठी राहणार आहे. तर शहादा तालुक्यातील पुसनद ही एस.टी. तर टेंभे ता.शहादा व कुढावद तर्फे सारंगखेडा या ग्रामपंचायती एस.सी. प्रवर्गासाठी राखीव राहतील.