अन्यथा उपचारासाठी बेडची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 11:25 IST2020-09-15T11:25:10+5:302020-09-15T11:25:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचे आढळून येणारे रुग्ण आणि त्यांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी रुग्णांलयांमधील बेडची संख्या ...

Otherwise scarcity of beds for treatment | अन्यथा उपचारासाठी बेडची टंचाई

अन्यथा उपचारासाठी बेडची टंचाई


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचे आढळून येणारे रुग्ण आणि त्यांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी रुग्णांलयांमधील बेडची संख्या यांचा ताळमळे सध्या लागत असला तरी येत्या काळात वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता आणखी बेड संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. सद्य स्थितीत शहादा तालुक्यात सर्वाधिक ४८५ रुग्ण तर नंदुरबार तालुक्यात ३३७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एकुण ९८० बेड असून ३४ बेड शिल्लक आहेत. दरम्यान, ३४ जण इतर जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दीड महिन्यात तब्बल तीन हजारापेक्षा अधीक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या कन्युनिटी स्प्रेड अर्थात सामुुहिक संसर्गाच्या टप्प्यावर जिल्हा आहे. येत्या काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा धोका लक्षात घेता आतापासूनच जिल्ह्यात उपाययोजना आवश्यक आहे.
बेडची संख्या
जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात खाजगी हॉस्पीटलांना कोविड उपचारासाठी परवाणगी दिली होती. सुरुवातीला नंदुरबारातील एका रुग्णालयास २५ बेडचे नंतर त्यालाच ४० बेडची परवाणगी देण्यात आली. नंतर दुसऱ्या हॉस्पीटलला ५० बेडची परवाणगी देण्यात आली. शहादा येथेही दोन हॉस्पीटल सुरु करण्यात आले. नवापूर तालुक्यात चार असे जिल्ह्यात खाजगी आठ हॉस्पीटल सुरू करण्यात आले आहेत. त्यातील बेडची संख्या ही २६० पर्यंत आहे. इतर बेड हे जिल्हा आणि तालुका स्तरावरील शासकीय रुग्णालयांमधील आहेत. नंदुरबार आणि शहादा येथे शासकीय कोविड उपचार केंद्रात आणखी बेडची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
शहाद्याने नंदुरबारला टाकले मागे
सद्य स्थितीत शहादा तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. उपचार घेणाºया रुग्णांमध्ये तब्बल ४८५ रुग्ण हे शहादा तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यात ३३७ रुग्ण
उपचार घेत आहेत. तळोदा तालुक्यात ९३, नवापूर तालुक्यात ७२, अक्कलकुवा तालुक्यात ६१ तर धडगाव तालुक्यात एकही रुग्ण सद्य स्थितीत उपचार घेत नसल्याची स्थिती आहे. एकुण रुग्णांमध्ये नंदुरबार तालुक्यात आतापर्यत १,५३८ रुग्ण आढळून आले आहेत. शहादा तालुक्यात १,३३९, तळोदा तालुक्यात ३७४, नवापूर तालुक्यात ३४४, अक्कलकुवा तालुुक्यात ९७, धडगाव तालुक्यात १२ रुग्ण आढळून आले आहेत.
मृतांमध्ये नंदुरबार आघाडीवर
मृतांचा आकडा शतक पार झाला आहे. एकुण १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात नंदुरबार तालुक्यातील ४२, शहादा तालुक्यातील ३४, तळोदा तालुक्यातील १२, नवापूर तालुक्यात १३ तर धडगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झााल आहे.
नंदुरबार तालुका : जिल्हा रुग्णालय : १५०, एकलव्य कोविड सेंटर : २७०, निम्स हॉस्पिटल : ४०, स्मित हॉस्पिटल : ५०.
शहादा तालुका : शासकीय कोविड सेटर : १२०, बी.डी.पाटील हॉस्पीटल : २५, कुलकर्णी हॉस्पीटल : २५.
नवापूर तालुका : शासकीय कोविड सेटर : ५०, चिंचपाडा हॉस्पीटल : ४०, गे्रस हॉस्पीटल : ४०, आयशफा हॉस्पीटल : ४०
तळोदा तालुका : सलसाडी कोविड केअर सेंटर : ५०
अक्कलकुवा तालुका : जवाहर नवोदय कोविड केअर सेंटर : ४०
धडगाव तालुका : शाकीय कोविड केअर सेंटर : ४०
नजीकच्या सुरत येथेही अनेकजण उपचारासाठी जात आहेत.
 

Web Title: Otherwise scarcity of beds for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.