सिव्हीलचे इतर विभाग वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:01 IST2020-07-08T12:01:03+5:302020-07-08T12:01:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या १५ पेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा ...

सिव्हीलचे इतर विभाग वाऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या १५ पेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता़ यानंतर इतर वॉर्डात उपाययोजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे असताना मात्र सर्व असल्याचे समोर आले आहे़ वॉर्डांमध्ये असलेला निष्काळजीपणा आवारातही कायम असल्याने कोरोनामुक्तीच्या केवळ वल्गना ठरण्याची शक्यता आहे़
मंगळवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हा रुग्णालयाच्या विविध वॉर्डांमध्ये भेट दिली असता, कर्मचारी आणि मुक्कामी असलेले रुग्णांचे नातलग यांना कोरोनाबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून आले आहे़ येथील कोविड कक्षाकडे जाणारा रस्ता वगळता इतर सर्व ठिकाणी कोणीही यावे अन् फिरत बसावे अशी गत आहे़ दुपारच्यावेळी रुग्णालयातील ओपीडी बंद असल्याने रुग्णांचे नातेवाईक कोणत्याही प्रकारे मास्कविनाच व्हरांड्यांमध्ये, रूग्णांच्या बेडवर विनासायस आराम करत असल्याचे तर कर्तव्य बजावणारे आरोग्य कर्मचारीही मास्क, हँडग्लोव्हज न वापरता कक्षांमध्ये फिरत असल्याचे समोर आले़ सध्याच्या वातावरणामुळे सर्वच कर्मचारी सतत पीपीई कीट घालून वावरू शकत नसले तरी वॉर्डात रूग्णांची सेवा करताना मात्र आवश्यक त्या उपाययोजना करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे याठिकाणी दिसून आले़ रुग्णालयात येणारे ट्रेनी नर्सिंग कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांना मास्कची सक्ती करुनही ते लावत नसल्याचे समोर आले़
जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रालयात कोविड कक्षाची उभारणी करण्यात आली आहे़ याठिकाणी जाण्यासाठी मुख्य इमारतीच्या बाजूूने रस्ता आहे़ याठिकाणी पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे़ जाणाऱ्या येणाºया अनोळखींची चौकशी फक्त याच ठिकाणी करण्यात येत आहे़ पोलीस कर्मचारी न चुकता हजेरी बुकवर माहिती विचारुन घेत आहेत़ कक्षाकडे स्वॅब देण्यासाठी जाणाऱ्यांच्याही नोंदी घेण्यात आल्या आहेत़
४जिल्हा रुग्णालयात सध्या २३० रुग्ण दाखल आहेत़ विविध वॉर्डात दाखल असलेल्या या रुग्णांसोबत त्यांचे एक किंवा दोन नातलग येथे मुक्कामी असतात़ दुपारच्यावेळी अनेक नातेवाईक हे रुग्णालयातच जागा मिळेल तेथे उपाययोजनांविनाच नाईलाजाने बसून असतात़
४रुग्णालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारातून आतील भागात कोणासही सहज प्रवेश मिळत असल्याचे चित्र याठिकाणी आहे़ आतील सर्वच वॉर्डात नियुक्त वॉर्डबॉय, परिचारिका यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी कक्षात कार्यरत असले तरी ते मास्क वगळता इतर स्साधने वापरत नसल्याचे दिसून आले़
४वॉर्डांबाहेर नातेवाईक गर्दी करुन बसत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे़
४स्वच्छतेबाबत जिल्हा रुग्णालय आघाडीवर असले तरी गोळा करुन ठेवलेले बायामेडिकल वेस्ट बॅगांमध्ये भरुन पडून असल्याचे काही कक्षात दिसून आले़ हा कचरा नेमका कधी फेकला जाईल याचीही माहिती तेथील कर्मचारी देऊ शकले नाहीत़