शहादा महाविद्यालयात जैवविविधता दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:21+5:302021-05-26T04:31:21+5:30

या चर्चा सत्रासाठी ५४६ विद्यार्थी आणि शिक्षकांनी नोंदणी केली आणि जवळपास ८०० विद्यार्थी आणि शिक्षकांनी यु ट्युबच्या माध्यमातून या ...

Organizing a seminar on the occasion of Biodiversity Day at Shahada College | शहादा महाविद्यालयात जैवविविधता दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

शहादा महाविद्यालयात जैवविविधता दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

या चर्चा सत्रासाठी ५४६ विद्यार्थी आणि शिक्षकांनी नोंदणी केली आणि जवळपास ८०० विद्यार्थी आणि शिक्षकांनी यु ट्युबच्या माध्यमातून या चर्चासत्राचा आस्वाद घेतला.

या चर्चा सत्राची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. विभागप्रमुख प्रा.डॉ. एस.के. तायडे यांनी वनस्पतीशास्त्र विभाग आणि बॉटनी क्लबची माहिती प्रेक्षकांना दिली. डॉ.एस.एस. पाठक यांनी पाहुणे वक्ते प्रा.डॉ.भारत मैत्रेय यांची ओळख सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना करून दिली. त्यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि IQAC समन्वयक डॉ.एम.के. पटेल यांनी महाविद्यालय आणि चर्चासत्राबद्दल सर्वांना अवगत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.आर.एस. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात पृथ्वीवरील जैवविविधता आणि तिचे महत्व यावर प्रकाश टाकला. प्रा.डॉ. भारत मैत्रेय यांचे & quot; जैवविविधता आणि त्याचे संरक्षण & quot; बद्दल महत्वाच्या बाबी सर्वांपुढे मांडल्या. या चर्चासत्राचा शेवट प्रा.विजया पाटील यांनी आभार मानून केला.

या चर्चासत्राच्या आयोजनासाठी डॉ.जय पांड्या, गुजरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन बॉटनी क्लब समन्वयक प्रा.महेश जगताप यांनी केले. चर्चासत्रासाठी प्रा.नीलेश आठवले, डॉ.मिलिंद पाटील, प्रा.हितेंद्र जाधव व प्रा.केशव कोळी यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, प्राचार्य आर.एस. पाटील, उप्राचार्य डॉ.एम.के. पटेल आणि उप्राचार्य सिंदखेडकर यांनी वनस्पतीशास्त्र विभागाचे कौतुक केले.

Web Title: Organizing a seminar on the occasion of Biodiversity Day at Shahada College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.