जयनगर येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST2021-04-25T04:30:41+5:302021-04-25T04:30:41+5:30
जयनगर येथे ४५ वर्षांपुढील जास्तीत-जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे, याकरिता ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाने येथील चक्रधर माध्यमिक ...

जयनगर येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन
जयनगर येथे ४५ वर्षांपुढील जास्तीत-जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे, याकरिता ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाने येथील चक्रधर माध्यमिक विद्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या प्रारंभी उपसरपंच सुनील माळी यांना लस देण्यात आली.
यावेळी जयनगर प्राथमिक उपकेंद्राचे डॉ. महेंद्र पाटील, डॉ. प्रशांत पटेल, आरोग्य सेविका संगीता इंगळे, आरोग्य सहायक, अंगणवाडी सेविका, आशा मदतनीस यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच मीनाबाई सोनवणे, उपसरपंच सुनील माळी, ग्रामसेवक केशव वसावे, तलाठी किशोर जाधव, म. फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी, कोतवाल दयाराम सोनवणे, संगणक ऑपरेटर प्रकाश राठोड, रोजगार सेवक संजय पाटील, शिपाई काशिनाथ पाटील, रोहिदास सोनवणे, माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.