शहादा जायण्टस ग्रुपतर्फे अवयवदान जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:40+5:302021-08-15T04:31:40+5:30
अध्यक्षस्थानी आर.टी. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विवेक नगीन पाटील, डॉ. लकेशकुमार पाटील, फेडरेशन अधिकारी माणक चौधरी, जायण्टसचे ...

शहादा जायण्टस ग्रुपतर्फे अवयवदान जनजागृती कार्यक्रम
अध्यक्षस्थानी आर.टी. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विवेक नगीन पाटील, डॉ. लकेशकुमार पाटील, फेडरेशन अधिकारी माणक चौधरी, जायण्टसचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, के.के. सोनार उपस्थित होते. या वेळी डॉ. विवेक पाटील यांनी मानवी शरीराचे कोणकोणते अवयव दान करता येतात त्याविषयी माहिती दिली. त्याबाबत असलेले गैरसमज, भीती, अपप्रचार व अज्ञान याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. लकेशकुमार पाटील यांनी अवयव सुदृढ होण्यासाठी व्यायाम व त्याचे प्रकार सांगितले. माणक चौधरी यांनी अज्ञानामुळे आपण अवयवदानात खूप मागे आहोत ते वाढवणे गरजेचे आहे. अवयवदान करणाऱ्यांची संख्या वाढली तर आपल्या देशाची उंची वाढेल, असे प्रतिपादन केले. आर. टी. पाटील यांनी अवयवदान हा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्याचा प्रचार-प्रसार करणे काळजी गरज आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन भूषण बाविस्कर यांनी तर आभार के.के. सोनार यांनी मानले.