लोकदालतीत सव्वातीन कोटींच्या वसुलीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:25 IST2020-12-14T12:25:45+5:302020-12-14T12:25:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ६८४ प्रकरणाचा निपटारा हाेवून तीन कोटी ...

लोकदालतीत सव्वातीन कोटींच्या वसुलीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ६८४ प्रकरणाचा निपटारा हाेवून तीन कोटी २९ लाख २९ हजार ७६ रूपयांची वसुलीचे आदेश देण्यात आले.
राष्ट्रीय लोकन्यायालयास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश प्रमोद एस. तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. टी. मलिये यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यासाठी मुख्यालयातील तदर्थ जिल्हा न्या ए. एस. भागवत, वरिष्ट स्तर दिवाणी न्या. एल.डी गायकवाड मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही .जी.चव्हाण, कनिष्ट.स्तर सह दिवाणी न्या. एस. ए. विराणी, व कनिष्ट स्तर दुसरे सह दिवाणी न्या. एन.बी.पाटील यांनी पॅनल प्रमुख म्हणुन काम पाहिले. त्यांना मदतीसाठी विधिज्ञ ए.सी.खैरनार, के.एच.सावळे, एस.ए.सोनार, एस.ए.सावंत, डी.एस.पार्टील, ए.बी.कढरे, अमरसिंग राजपुत, गोविंद चव्हाण, पी.ए.पाटील व विधी महाविदयालयाचे प्राचार्य . एन.डी.चौधरी, यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम केले.
लोकन्यायालयात खालीलप्रमाणे प्रकरणे ठेवण्यात येऊन सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहे. संपूर्ण जिल्हयातील निकाली झालेल्या न्यायालयातील एकुण प्रलंबित प्रकरणांमध्ये निकाली १७ दिवाणी प्रकरणात एक लाख रूपये वसुली झाली
बॅक वसुलीचे सहा प्रकरणात तीन लाख ८६ हजार ६४६ वसुली झाली मोटार अपघाताच्या ३८ प्रकरणात एक कोटी ५८ लाख २४ हजार १७७ रुपये. धनादेश अनादरच्या २७ प्रकरणात ४८ लाख ७९ हजार १०९ रूपये, कैाटुबिक वाद प्रकरणे व फौजदारी वादाची १० प्रकरणे अशी ९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात दोन कोटी ११ लाख ८९ हजार ९३२ रूपये वसुली करणयात आली.
तर संपूर्ण जिल्हयातील निकाली झालेल्या एकुण दाखलपुर्व प्रकरणांत बॅक वसुलीची ८३ प्रकरणे निकाली काढून एक कोटी १३ लाख आठ हजार ४६७ रूपयांची वसुली तर वीज थकबाकी वसुलीची १८ प्रकरणे निकाली काढून एक लाख ४६ हजार ३२० व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची ४८५ प्रकरणे निकाली काढत दोन लाख ८४ हजार ३५७ रूपये अशी ५८६ प्रकरणे निकाली काढत एक कोटी १७ लाख ३९ हजार १४४ रूपयांची वसुली झाली.