शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश : आमदार चंद्रकांत रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:15 IST

नवापूरात तालुका काँग्रेस कमिटीची बैठक

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : काँग्रेस पक्षाची विचारधारा लोककल्याणकारी असून हे जनतेला पटवून देण्याचे कार्य प्रत्येक कार्यकत्र्याने कराव़े त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन काँग्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कॉग्रेस भवन येथे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, मार्केट कमेटी सदस्य, शेतकरी सहकारी संघाचे संचालक, नवापूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच काँग्रेस पक्षाच्या विविध आघाडय़ांचे प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली.बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री माणिकराव गावीत, नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, पंचायत समिती सभापती सविता गावीत, उपसभापती दिलीप गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अजित नाईक, पालिकेचे गटनेते गिरीष गावीत, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आर.सी. गावीत, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विक्रम वळवी, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे उपस्थित होते.सभेला मार्गदर्शन करतांना आमदार रघुवंशी यांनी यांनी सांगितले की, आताचे भाजप सरकार फक्त जाहीराती करत आहे. उपेक्षित व गरीब लोकांसाठी असलेल्या योजना, अनुदान भाजप सरकार बंद करत आहे. आता झालेल्या नवापूर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकजुट ठेऊन यश मिळविले. तरुणांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांवर कॉग्रेसचा ङोंडा फडकवा असे आवाहन त्यांनी केले.तालुकाअध्यक्ष भरत गावीत म्हणाले की, सरपंचांनी ज्या-ज्या समस्या माडल्या, त्या सोडविण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितल़े आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक म्हणाले की, भाजप सरकार खोटी आश्वासने देऊन शेतकरी व गरीब जनतेला भुलथापा देत आहेत. कर्ज माफीचा घोळ अजूनही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. माजी केद्रीय मंत्री माणिकराव गावीत म्हणाले की, भाजपने जनतेला दिलेले आश्वासने पुर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. नोटाबंदी व जी.एस.टी मुळे लहान उद्योग धंदे बंद पडले असल्याचे सांगितल़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत व आर.सी.गावीत यांनी केले तर आभार भरत गावीत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावीत, सुभाष गावीत, आयुब गावीत, अरविंद गावीत, आशिक गावीत, दत्तु गावीत, ताहीर पठाण यांनी परीश्रम घेतले.