जिल्ह्यात पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:44 IST2019-11-08T12:44:33+5:302019-11-08T12:44:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 2 हजार 400 हेक्टर क्षेत्रावरचे पंचनामे कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या पथकाने पूर्ण ...

Order for continuation of Panchanam in the district | जिल्ह्यात पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश

जिल्ह्यात पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 2 हजार 400 हेक्टर क्षेत्रावरचे पंचनामे कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या पथकाने पूर्ण केले आहेत़ यानंतरही जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने  पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिले असून त्यानुसार कारवाई सुरु झाली आह़े 
जिल्ह्यात गेल्या दोन आठवडय़ात वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आह़े अवकाळीची मार बसल्याने कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबीन यासह विविध पिकांचे नुकसानीमुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसला आह़े शासनाच्या आदेशानुसार महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे 700 अधिकारी व कर्मचारी या पिकांचे पंचनामे करण्यासाठी गेल्या आठवडय़ापासून कामाला लागले होत़े यातून बुधवार सायंकाळर्पयत 2 हजार 400 हेक्टरवरच्या शेतीपिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळपासून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती़ यामुळे या भागात पथके पुन्हा रवाना करण्यात आली आह़े या पंचनाम्यांचा अहवाल शुक्रवारी किंवा शनिवारी पूर्ण होऊन सोमवारी जिल्हाधिकारी यांना सादर होणार आह़े यानंतर पुढील कारवाई शक्य आह़े 


बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील 881 हेक्टर क्षेत्रचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होत़े यानुसार नंदुरबार 335, नवापुर 160, शहादा 284़30, धडगाव 60 तर अक्कलकुवा तालुक्यात 42 हेक्टरवर पंचनामे पूर्ण झाले आहेत़ 
जिल्ह्यात आतार्पयत 2 हजार 437 हेक्टर क्षेत्रात पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ यात नंदुरबार 45, नवापुर 212, शहादा 960, धडगाव 943 तर अक्कलकुवा तालुक्यात 275 हेक्टर क्षेत्रात पंचनामे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े 
शेतकरी निहाय संख्येनुसार जिल्ह्यात बुधवार सायंकाळर्पयत नंदुरबार 20, नवापुर 781, शहादा 1 हजार 421, धडगाव 2 हजार 54, तर अक्कलकुवा तालुक्यात 640 अशा एकूण 4 हजार 916 शेतक:यांचे पंचनामे पूर्ण झाल़े 
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नुकसान झाले असताना केवळ पाचच तालुक्यात पंचनामे करण्यात आल्याचे शासकीय अहवालातून समोर आले आह़े यामुळे तळोदा तालुक्यात नुकसान होऊनही शेतकरी वंचित असल्याचे स्पष्ट होत आह़े 

दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात पुणे येथून कृषी आयुक्त यांनी पाठवलेल्या अधिका:यांच्या पथकाने पाहणी करुन माहिती घेतली़ नंदुरबारसह दुर्गम भागातील विविध ठिकाणी अधिका:यांनी भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतला होता़ अधिकारी शेतक:यांसोबत संवाद साधून माहिती घेत होत़े हे पथक सायंकाळर्पयत जिल्ह्यात भेटी देत असल्याची माहिती आह़े 
 

Web Title: Order for continuation of Panchanam in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.