नर्मदा नियंत्रण प्राधिकरण संचालकांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:51 IST2020-03-07T12:46:49+5:302020-03-07T12:51:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदा नियंत्रण प्राधिकरण संचालक डॉ.अफरोज अहमद यांच्या अध्यक्षतेखाली पुर्नवसन गावठाण व सरदार सरोवर प्रकल्प ...

Opposition to the Director of the Narmada Control Authority | नर्मदा नियंत्रण प्राधिकरण संचालकांना विरोध

नर्मदा नियंत्रण प्राधिकरण संचालकांना विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नर्मदा नियंत्रण प्राधिकरण संचालक डॉ.अफरोज अहमद यांच्या अध्यक्षतेखाली पुर्नवसन गावठाण व सरदार सरोवर प्रकल्प संबंधित आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. दरम्यान, नर्मदा बचाव आंदोलनातर्फे सर्कीट हाऊसवर अहमद यांना घेराव घालण्यात आला.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सरदार सरोवर प्रकल्पाचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत डॉ.अहमद यांनी सरदार सरोवर प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन, भूसंपादन, महाराष्ट्रातील बुडीत क्षेत्राची सद्यस्थिती, सरदार सरोवर प्रकल्प बांधिताना वाटप करण्यात येणाऱ्या जमीनी, सिंचन सुविधा, भुखंड वाटप, सानुग्रह अनुदान, याबाबत आढावा घेतला. त्यांनी सांगितले, गुजरात राज्यात पुनर्वसन स्विकारलेल्या महाराष्ट्रातील प्रकल्पबाधितांच्या जमीन व सिंचन इत्यादी संदर्भात ११५ प्रकल्प बाधीतांच्या तक्रारी प्राप्त आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. पुनर्वसनामुळे एकत्रित वस्ती झाल्याने पुनर्वसन गावठाणातील शेती आधुनिक पध्दतीने केली जाऊ लागली आहे. जमीन वाटप, शैक्षणिक व आरोग्य सुविधा इत्यादी मुळे प्रकल्पबाधितांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सक्रीट हाऊसवर दुपारी अचानक धडक दिली. या ठिकाणी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे संचालक डॉ.अफरोज अहमद थांबले होते. तेथे बैठकही घेणार होते. परंतु आंदोलनाचे कार्यकर्ते लतिका राजपूत, चेतन साळवे व इतरांनी धडक देत गो बॅकचा नारा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून ते या पदावर आहेत. परंतु त्यांच्याकडून न्याय मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणने होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.

Web Title: Opposition to the Director of the Narmada Control Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.