शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

घरकुल रंगकाम विषयाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 3:04 PM

नंदुरबार :  घरकुल बांधकाम ठेकेदाराची घरकुलांना रंगकाम करण्याची जबाबदारी असतांना पालिकेने नव्याने निविदा काढून रंगकाम करणार आहे. या  विषयाला ...

नंदुरबार :  घरकुल बांधकाम ठेकेदाराची घरकुलांना रंगकाम करण्याची जबाबदारी असतांना पालिकेने नव्याने निविदा काढून रंगकाम करणार आहे. या  विषयाला विरोध करीत विरोधकांनी हा विषय रद्द करण्याची मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. दरम्यान, विषय पत्रिकेवरील दहा विषय सर्वानुमते मंजुर करण्यात आले.पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष परवेजखान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मदनमोहन नगर व तैय्यबीनगर या भागातील खुल्या जागांवर चेनलिंक फेन्सींग कामाचा एकुण साडेअकरा लाख रुपये खर्चाच्या विषयाला विरोधकांनी विरोध केला. आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी चैनलिंक फेन्सिंग च्या कामांना पालिका सत्ताधा:यांनी मंजुरी दिल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. बैठकांमध्ये मुख्याधिकारी वेळोवेळी विरोधी नगरसेवकांना चुकीची माहिती देत असल्याचाही आरोप विरोधी नगरसेवकांच्या गटनेत्यांनी केला. विषय पत्रिकेच्या अजेंड्यावरील दहा विषयांवर चर्चा करण्यात आली.विकासकाकडून नगरपालिका बेटरमेंट शुल्क आकारण्यात असते. त्या शुल्कातून पालिका रस्ते  पथदिव्यांसह इतर सुविधा पुरविते. परंतु पालिका शासनाच्या निधी मधून ही चेनलिंक फेन्सींगची कामे करीत असल्याचा आरोप विरोधी गटनेते व नगरसेवक गौरव चौधरी यांनी केला.  सभेच्या प्रारंभी धडगाव तालुक्यातील भूषण पॉईंट जवळ झालेल्या बोट दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर सभेचे कामकाज सुरू करण्यात आले.बैठकीत भोणे रस्त्यावरील आणि जिल्हा रुग्णालयासमोरील घरकुलांना रंगकाम करणे, संभाजीनगरमध्ये सार्वजनिक शौचालय बांधणे, वेणू गोपालनगरमध्ये रस्ता कामास मुदतवाढ मिळणे. विविध कामांसाठी वैशिष्टयेपुर्ण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी व शासनाकडून अनुदान मागणीचा प्रस्ताव मांडण्यात आला. जलशुद्धीकरण केंद्रासाठी विविध वस्तू खरेदीला मान्यता देण्यात आली. पाईपलाईन लिकेज दुरूस्ती, पाणी पुरवठा विभागाकडील कामे करणे यासाठी अभिकर्ता नियुक्त करण्यास व खर्चास मान्यता देण्यात आली. याशिवाय तिमाही खर्चासही मंजुरी देण्यात आली.बैठकीला सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्याधिकारी गणेश गिरी, कार्यालयीन अधीक्षक संजय माळी, तुकाराम मराठे उपस्थित होते.