आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात शिक्षणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:36 IST2019-12-28T12:35:48+5:302019-12-28T12:36:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभागातर्फे तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कूलमध्ये ...

Opportunity for Aboriginal students to learn English | आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात शिक्षणाची संधी

आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात शिक्षणाची संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी विकास विभागातर्फे तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे तिन्ही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पुन्हा तळोदा प्रकल्पामार्फत नामांकित शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत पेठ रोड नाशिक, पिंप्रीसद्रोद्दीन, नंदुरबार, आजमेर सौंदाणे (ता. बागलाण), मोवशी (जि.नगर), पिंपळनेर, टिटवे, ढोंगसागाळी, अक्कलकुवा, धडगाव व चकणापूर ता. कळवण येथील एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कूल व नामांकीत आश्रमशाळांमध्ये तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी, सातवी व नववी या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी १५ मार्च रोजी स्पर्धा परिक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी तिन्ही तालुक्यांमधील गटसाधन केंद्रांसह तळोदा प्रकल्प कार्यालयात अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित शाळांमार्फत इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज दि. ५ जानेवारीपर्यंत मागविण्यात आले असल्याची माहिती तळोदा प्रकल्पामार्फत देण्यात आली

Web Title: Opportunity for Aboriginal students to learn English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.