प्रकाशा येथे विलगीकरण कक्ष कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:51+5:302021-04-17T04:29:51+5:30
प्रकाशा : जे कोरोना बाधित आहेत परंतु त्यांच्यामध्ये विशेष लक्षणं नाही अशांसाठी येथील सद्गुरू धर्मशाळेमध्ये विलगीकरण कक्ष कार्यान्वित ...

प्रकाशा येथे विलगीकरण कक्ष कार्यान्वित
प्रकाशा : जे कोरोना बाधित आहेत परंतु त्यांच्यामध्ये विशेष लक्षणं नाही अशांसाठी येथील सद्गुरू धर्मशाळेमध्ये विलगीकरण कक्ष कार्यान्वित झाला आहे. या ठिकाणी दररोज वैद्यकीय अधिकारी, महसूल विभाग व ग्रामपंचायत विभागाचे प्रतिनिधी भेट देऊन पाहणी करीत आहेत.
येथे वीस खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. एका खोलीत दोन बेड याप्रमाणे चाळीस रुग्णाची सोय करण्यात आली आहे.
घरोघरी पाहणी करून आणले रुग्ण
सुरुवातीचे दोन दिवस कक्ष सुरू करूनही कोणी येईना, अशी स्थिती येथे होती. शेवटी मंडल अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज चौधरी, सरपंच सुदाम ठाकरे, ग्राम विकास अधिकारी बी.जी. पाटील, पोलीस सुनील पाडवी यांनी स्वत: कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी जाऊन समज देऊन त्यांना विलीगीकरण कक्षात आणले. अशाप्रकार
पहिल्या दिवशी पाच व दुसऱ्या दिवशी सहा रुग्ण झाले. आता त्यांची संख्या बारा झाली आहे.
सकाळी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विवेक बावस्कर यांनी त्यांची तपासणी केली व लागणारी औषधी देण्यात आली. दिवसभरातून दोनवेळा वैद्यकीय अधिकारी भेट देतात. याचबरोबर महसूल विभागाकडून सद्गुरू धर्मशाळा आणि प्रकाशा ग्रामपंचायत यांचा सहकार्याने सकाळी चहा,नंतर नाश्ता व दोन वेळचे जेवण त्यांना देण्यात येत आहे.
या विलगीकरण कक्षाकडे शहादा प्रांत अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तथा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी हे लक्ष ठेवून आहेत. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी देखील या ठिकाणी काल विलगीकरण कक्षाला भेट दिली. तेव्हा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामलाल पारधी, रवींद्र पाटील, उर्दू शाळेचे जावेद खान आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
प्रकाशा येथील विलगीकरण कक्षाची तपासणी करताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विवेक बावस्कर, सोबत तलाठी धर्मराज पाटील, मंडल अधिकारी मुकेश चव्हाण, ग्राम विकास अधिकारी बी.जी. पाटील, सरपंच सुदाम ठाकरे आदी (नरेंद्र गुरव).