एकाच ग्रामपंचायतीत 12 अंगणवाडय़ा उघडय़ावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:43 IST2019-11-04T13:43:51+5:302019-11-04T13:43:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील चिखली  ता. धडगाव या एकाच ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या 12 अंगणवाडय़ांसाठी शासनाकडून अद्याप ...

Opening of 12 courtyards in a single Gram Panchayat | एकाच ग्रामपंचायतीत 12 अंगणवाडय़ा उघडय़ावर

एकाच ग्रामपंचायतीत 12 अंगणवाडय़ा उघडय़ावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील चिखली  ता. धडगाव या एकाच ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या 12 अंगणवाडय़ांसाठी शासनाकडून अद्याप इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे शेकडो विद्याथ्र्याचे उघडय़ावरच पोषण आहार वाटप करण्यात येत आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार इमारती मागणीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
एकाच ग्रामपंचायत अंतर्गत तब्बल 12 अंगणवाडी केंद्रांसाठी शासनाकडून इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नसल्याचे वास्तव आढळून आले आहे. हे वास्तव चिखली ग्रामपंचायत अंतर्गत बिलगाव, साव:यादिगर व अन्य गावांमध्ये दिसून येत आहे. अंगणवाडीच्या समस्या व अन्य  विषयांवर चर्चा करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेत सरपंच गुलीबाई पावरा, उपसरपंच दिलीप पावरा, ग्रामसेवक डी.एस.पाटील, तापीबाई पावरा, सुरज पाडवी, मधू वळवी, जयश्री वळवी, फेंदा पावरा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री व शबरी आवास योजना, ठक्कर बाप्पा योजना, 14 वा वित्त आयोगाचा निधी आदी विषयांवर चर्चा करण्यात होती. दरम्यान इमारती नसलेल्या अंगणवाडय़ांसाठी इमारतीची मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार शासनाकडे मागणीचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे. याशिवाय याच भागातील अन्य भागातील अन्य ग्रामपंचायतींमधील अंगणवाडय़ांनाही इमारत उपल्ध झाल्या नाही.

चिखली हे गाव त्या परिसरातील गावांना मध्यवर्ती ठरते. त्यामुळे तेथे ग्रामपंचायत कार्यान्वित करण्यात आली आहे, शिवाय तेथे पोस्ट विभागाचे डाकघर देखील असल्याचे समजते. परंतु तेथील अंगणवाडीसाठी इमारत नसल्यामुळे मोठी शोकांतिका ठरत आहे. 
4त्रिशुल या गावातील सात अंगणवाडय़ांना इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे कदाचित या गावात सातच अंगणवाडय़ा असाव्या असा अंदाज आहे.बिलगावचा आडीखुडीपाडा साव:यादिगर, चिखलीबोरी येथील आमखेडीपाडा व कारभारीपाडा
त्रिशुल गावातील त्रिशुल, वलहानीपाडा, भुगदई पाडा, पाटील पाडा, पिंपरघोटपाडा, शेंगळीपाडा व निली कामोद येथील अंगणवाडय़ांना  इमारती उपलब्ध झाल्या नाही. 
 

Web Title: Opening of 12 courtyards in a single Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.