शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शिक्षकांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्राथमिक शिक्षक पदवीधर पदे पदोन्नतीने भरण्यासाठी सुधारित पदवीधर सेवाजेष्ठता यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्राथमिक शिक्षक पदवीधर पदे पदोन्नतीने भरण्यासाठी सुधारित पदवीधर सेवाजेष्ठता यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या भाषा व समाजशास्त्र विषयाची पदवीधर सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. सदर यादीत फक्त बी.ए.बी.एड.शिक्षकांच्या प्रशिक्षित पदवीधर म्हणून समावेश करण्यात आलेला होता. यास अखिल नंदुरबार जिल्हा संघाच्या वतीने आक्षेप  घेण्यात आला होता. जे प्राथमिक शिक्षक दहावी, बारावीच्या डी.एड.नंतर नोकरीस लागलेले होते त्यांनी सेवेत असतांना पदवी परीक्षा पास करून घेतलेली असेल अशा शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षक समजून त्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत समावेश करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश शासनाच्या आदेशात दिले आहेत. ही बाब संघटनेच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम साहेब व उपशिक्षणाधिकारी बी.एन.रोकडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या अनुषंगाने संघटनेने घेतलेल्या हरकतीच्या व अनेक शिक्षकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन शिक्षण विभागाने सुधारित सेवा जेष्ठता यादी प्रकाशित केलेली आहे. या यादीत शिक्षक पदवीधर झालेले आहेत. परंतु बी.एड.  नाहीत अशांचाही सेवाजेष्ठतेने समावेश केलेला आहे. त्यामुळे सामान्य शिक्षकांना ही शासन निर्णयाप्रमाणे न्याय मिळाला आहे. शिक्षक जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष मोहन बिस्नारिया, अशोक देसले, रविंद्र बैसाणे यांनी ही माहिती दिली.