ओपन जिमने तापवले तळोद्याचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:02+5:302021-06-01T04:23:02+5:30

२०१९-२०२० साली आदिवासी उपयोजनेच्या निधीअंतर्गत तळोदा पालिकेच्या वतीने शहरातील नऊ ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये खुल्या जिम मंजूर झाल्या होत्या. त्याचा ...

Open gym heated bottom politics | ओपन जिमने तापवले तळोद्याचे राजकारण

ओपन जिमने तापवले तळोद्याचे राजकारण

२०१९-२०२० साली आदिवासी उपयोजनेच्या निधीअंतर्गत तळोदा पालिकेच्या वतीने शहरातील नऊ ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये खुल्या जिम मंजूर झाल्या होत्या. त्याचा निधी आता वर्ग करण्यात आल्याने मागील आठवड्यात तळोदा शहरातील नऊ ओपन स्पेसमध्ये या जिम बसविण्यात आल्या. शहरातील तापी माँ नगर व सीताई नगरमधील जिम संबंधित ठेकेदाराने चक्क काटेरी झुडपांमध्ये बसविले. यावर शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी पालिकेने जर त्या ठिकाणची काटेरी झुडपे काढली नाहीत तर शिवसेना ती ओपन जीम उखडून दुसऱ्या ठिकाणी बसवेल, असा इशारा सोशल मीडियावर दिला. क्रीडा विभागाच्या माध्यमातून या जिम बसविण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी थेट जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गाठत हा मुद्दा लावून धरला. एका नगरसेवकानेच तापी माँ नगरातील काटेरी झुडपांची जागा दाखवली, असे स्पष्टीकरण क्रीडा विभागाकडून देण्यात आले. मात्र पालिकेवर हे सर्व प्रकरण उलटत असल्याचे पाहून नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी शेवटपर्यंत पालिकेच्या पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता जिम बसविण्यात भूमिका शेवटपर्यंत लावून धरली.

याशिवाय प्रभाग क्रमांक दोनमध्ये ओपन जिमच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही असाच चर्चेला विषय ठरला आहे. प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवकांनी स्वखर्चातून उभारलेल्या उद्यानात बसविण्यात आलेल्या या जिमचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यासह भाजपचे नगरसेवक भास्कर मराठे, अमोनुद्दीन शेख यांच्याशिवाय भाजपाच्या दोन महिला नगरसेविकांचे पतीही उपस्थित होते. या वेळी उदेसिंग पाडवी व नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी एकाच व्यायामाच्या साहित्यावर व्यायामही करून घेतला. त्यामुळे त्यांच्या नात्यात या व्यायामामुळे पुन्हा नव्याने सदृढता येते की काय, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. नगराध्यक्ष व भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीवर आमदार राजेश पाडवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

एकंदरीत, तळोद्यात बसविण्यात आलेल्या ओपन जिमने शहरातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे. पालिका निवडणुकीला वर्ष-दीड वर्षाचा कालावधी बाकी आहे. असे असताना जिम असो व अन्य इतर बाबी यांच्या माध्यमातून विद्यमान प्रस्थापित लोकप्रतिनिधी व अनेक इच्छुक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते समाजकारण व राजकारणात सक्रिय होताना दिसून येत आहेत. ओपन जिमच्या निमित्ताने याचा प्रत्यय शहरवासींना पुन्हा एकदा आला आहे.

Web Title: Open gym heated bottom politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.