जिल्हा रुग्णालयात केवळ तीन व्हेंटीलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:49 AM2020-03-31T11:49:10+5:302020-03-31T11:49:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात केवळ तीन व्हेंटीलेटर आहेत़ यावर दक्षता ...

Only three ventilators in the district hospital | जिल्हा रुग्णालयात केवळ तीन व्हेंटीलेटर

जिल्हा रुग्णालयात केवळ तीन व्हेंटीलेटर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात केवळ तीन व्हेंटीलेटर आहेत़ यावर दक्षता म्हणून आरोग्य विभागाने जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांचे व्हेंटीलेटर अधिग्रहीत केले आहेत़
जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करुन कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी गेल्या महिन्याभरापूर्वीच प्रयत्न झाला होता़ यांतर्गत आजवर या कक्षात २३ जणांवर उपचार करुन त्यापैकी २२ जणांना घरी जाऊ देण्यात आले होते़ तर एका जणांवर कक्षात उपचार सुरु आहेत़ त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली तरी दक्षता म्हणून त्यांना येथे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ दरम्यान दिवसेंदिवस देशात कोरोनाची भिती वाढत असताना त्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्य सामुग्रीचा आढावा प्रशासन घेत आहे़ यात प्रामुख्याने व्हेंटीलेटरचा प्रश्न ऐरणीवर आला होतो़ रुग्णाच्या शरीरात शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा फैलाव झाल्यास त्याला कृत्रिम श्वासोच्छास प्रणाली अर्थात व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे़ जिल्हा रुग्णालयात अतीदक्षता विभागात यापूर्वी तीन व्हेंटीलेटर देण्यात आले होते़ हे तिन्ही व्हेंटीलेटर सध्या कोरोना विलगीकरण कक्षात देण्यात आले आहेत़ जिल्हा रुग्णालयाने दक्षता म्हणून जिल्ह्यात व्हेंटीलेटर असलेल्या खाजगी रुग्णालयांना पत्र दिले होते़ त्यानुसार १४ व्हेंटीलेटर अधिग्रहीत आहेत़
जिल्हा नियोजनकडून जिल्ह्यात व्हेंटीलेटरची संख्या वाढावी यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे़ यातून लवकरच चांगल्या दर्जाचे व्हेंटीलेटर मिळणार आहे़ जिल्हा प्रशासन व्हेंटीलेटर खरेदीसाठी आरोग्य विभागाला सातत्याने माहिती देत असून येत्या काही दिवसात तातडीची खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

एकीकडे व्हेंटीलेटरबाबत समस्या असताना दुसरीकडे कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने एचआयव्ही बाधितावर उपचारावेळी वापरण्यात येणाºया पीपीई अर्थात पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट वाढीव मागवले आहेत़ एचआयव्ही रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार हे खासकरुन या कीटचा वापर करतात़ हेच कीट सध्या कोरोना विलगीकरण कक्षात दाखल झालेल्यांवर उपचार करतेवेळी वापरण्यात येत आहे़ जिल्हा रुग्णालयाने २०० कीट सध्या मागवून घेतले आहेत़ परंतू दर दिवशी किमान १० ते १५ जण कीटचा वापर करत असल्याने लवकरच ते संपणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शासनाकडून लवकरच वाढीव कीट देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़

Web Title: Only three ventilators in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.