दोन दिवसात केवळ तीनच रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:45 IST2020-07-23T12:45:33+5:302020-07-23T12:45:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचे दोन दिवसात केवय तीनच रुग्ण आढळून आले आहेत. तर १४ जण कोरोनामुक्त झाले ...

दोन दिवसात केवळ तीनच रुग्ण आढळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचे दोन दिवसात केवय तीनच रुग्ण आढळून आले आहेत. तर १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, ५९ जणांचे अहवाल प्रलंबीत आहेत.
जिल्हावासीयांच्या दृष्टीने दोन दिवस समाधानाचे गेले. कोरोनाबाधीत केवळ तीनजण आढळून आले आहेत. बुधवारी शहादा येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर नंदुरबारातील तीन व सोनवद, ता.शहादा येथील एकजण कोरोनामुक्तत झाले आहेत. त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
अद्यापही जिल्ह्यातील ५९ जणांचे स्वॅब अहवाल प्रलंबीत आहेत. या अहवलांची प्रतिक्षा लागून आहे.