नंदुरबार शहरातील केवळ तीनच मंडळांनी घेतले कंपनीकडून कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:17 IST2019-09-03T12:17:14+5:302019-09-03T12:17:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज वितरण कंपनीकडून यंदा मंडळांना देऊ केलेल्या जोडणी उपक्रमाला आतार्पयत नंदुरबार शहरातून तीनच मंडळांनी ...

Only three boards in the city of Nandurbar took connections from the company | नंदुरबार शहरातील केवळ तीनच मंडळांनी घेतले कंपनीकडून कनेक्शन

नंदुरबार शहरातील केवळ तीनच मंडळांनी घेतले कंपनीकडून कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीज वितरण कंपनीकडून यंदा मंडळांना देऊ केलेल्या जोडणी उपक्रमाला आतार्पयत नंदुरबार शहरातून तीनच मंडळांनी प्रतिसाद दिला आह़े या मंडळांची जोडणी पूर्ण झाली आह़े 
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर दुर्घटना घडू नये यासाठी शांतता कमिटय़ांच्या बैठकांमध्ये पोलीस अधिका:यांनी वीज मंडळांकडून जोडण्या घेण्याचे आवाहन केले होत़े या आवाहनाला प्रतिसाद देत शहादा आणि नंदुरबार विभागात पोलीस परवानगी घेणा:या मंडळांनी वीज जोडणीसाठीही संपर्क केला होता़ परंतू प्रत्यक्षात मात्र जोडण्यांची संख्या ही नगण्य असल्याचे समोर आले आह़े नंदुरबार शहरातील तीनच मंडळांनी जोडण्या रक्कम भरुन जोडण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत़ दुसरीकडे येत्या तीन दिवसात मंडळांना जोडण्या देण्यावर कंपनी भर देणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
कंपनीचे अधिक्षक अभियंता आऱएम़चव्हाण यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी कंपनीकडून मंडळांना वीज जोडणी देण्याबाबत कारवाई होत आह़े येत्या तीन दिवसात वीज जोडण्या वाढवण्यावर भर दिला जाईल़ नंदुरबार आणि शहादा या  दोन्ही विभागात अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून वीज वाहिन्या दर दिवशी तपासल्या जाणार असल्याचे सांगितल़े 
दरम्यान मंडळांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने वीज वापराबाबत चिंता व्यक्त होत आह़े काही मंडळे स्वयंचलित जनरेटरचा वापर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होत़े शांतता कमिटय़ांच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांच्या अनुपस्थितीमुळे यंदा मंडळांच्या जोडण्या रखडल्याचे मंडळांच्या पदाधिका:यांकडून सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: Only three boards in the city of Nandurbar took connections from the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.