शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

पुढील खरीप हंगामात स्व-उत्पादित सोयाबीनचीच लागवड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST

सोयाबीन हे स्वपरागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर ...

सोयाबीन हे स्वपरागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्यांच्या उत्पादनातून होणारे सोयाबीन बियाणे दोन वर्षांपर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. शास्रीयदृष्ट्या असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. ग्रामबीजोत्पादन, पीक प्रात्यक्षिके योजनांतर्गत शेतकरी समूह यांच्यांकडून आलेल्या उत्पन्नातून बियाणांची चाळणी करून चांगल्या प्रतीच्या बियाणांची निवड करावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

सोयाबीन बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्यांची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाणांची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लॅस्टिक गोण्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची थप्पी सात फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणांची आदळआपट होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रतिहेक्टरी बियाणे दर ७६ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकन पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता ७०टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावेत. सोयाबीनची पेरणी ७५ ते १०० मि.मि.पाऊस झाल्यानंतरच करावी. बियाणांची पेरणी ३ ते ४ सेंटिमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.

रायझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकांची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाणांस पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावी व नंतर त्याची पेरणी पुढील हंगामात करावी. अधिक माहितीसाठी कृषी सहायक किंवा कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे विभागाने आवाहन केले आहे.